-3 C
New York
Thursday, January 16, 2025

Buy now

spot_img

*टी बी मुक्त ग्रामपंचायत अभियानांतर्गत बोरगाव ग्रामपंचायतीचा गौरव*

*टी बी मुक्त ग्रामपंचायत अभियानांतर्गत बोरगाव ग्रामपंचायतीचा गौरव*

शिरपूर :-  जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय धुळे तर्फे आयोजित टी बी मुक्त ग्रामपंचायत अभियानांतर्गत गौरव सोहळा 2023 साठी शिरपूर तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतीचा गौरव धुळे जिल्हाधिकारी श्री जितेंद्र पापडकर, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ धरती देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विशाल नरवाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री सचिन साहेब, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्री दत्ता साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी योगेंद्रसिंग दाजभाऊ सिसोदिया,दीपक पदमसिंग राजपूत व ग्रामसेवक पी बी सोनवणे उपस्थित होते.

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत मा जिल्हा क्षयरोग अधिकारी धुळे डॉ सोनिया बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सरपंच श्री योगेंद्रसिंग सिसोदिया, डॉ हेमंत पाटील वैदयकीय अधिकारी PHC वाडी, डॉ विनोद पाटील CHO जातोडा, वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक श्री धनराज पवार, छत्रसिंग राजपूत शिरपूर यांच्या उपस्थितीत टी. बी. मुक्त ग्रामपंचायत अभियान अंतर्गत मागच्या वर्षी बोरगाव येथे ग्रामपंचायत ची पडताळणी तालुका स्तरावरून करण्यात आली होती. तालुका आरोग्य विभाग व ग्रामपंचायत च्या उपाययोजनेमुळे गावात एकही क्षयरोग (टी बी) ग्रस्त रुग्ण आढळून आला नव्हता. त्यावेळेसच गांव टी बी मुक्त म्हणून घोषित करण्यात आले होते.

बोरगाव ग्रामपंचायतीच्या शिरपेचात पुन्हा मानाचा तुरा रोवला जात आहे. कारण आतापर्यत गावाला तंटामुक्त पुरस्कार, कोरोनामुक्त गांव, आदर्श सरपंच पुरस्कार व आता टी बी मुक्त ग्रामपंचायतीचा पुरस्काराने जिल्हाधिकाऱ्यांनी गौरविले आहे.

सन 2011-12 मध्ये तत्कालीन तंटामुक्त अध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या प्रयत्नांनी गावाला एक लाखाचा तंटामुक्त गांव पुरस्कार मिळाला होता तसेच 2020/21 व 21/22 या दोघं काळातील कोरोना महामारी च्या लाटेत ग्रामपंचायतीच्या दक्षतेमुळे एकही कोरोना रुग्ण आढळून आला नव्हता म्हणून त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनामुक्त ग्रामपंचायतींच्या सरपंचासोबत व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संवाद साधला होता व गांव कोरोनामुक्त ठेवल्याबद्दल बोरगावचे सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांची प्रशंसा केली होती.

आता पुन्हा टी. बी. मुक्त ग्रामपंचायतीचा पुरस्कार जिल्हाधिकारिंच्या हस्ते धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात मिळाला.

ग्रामपंचायतीच्या या गौरवास गावाचे ग्रामस्थ पात्र आहेत व त्यांच्यामुळेच हे शक्य होत असल्याचे योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी म्हटले आहे. पुरस्कार स्विकारण्यासाठी योगेंद्रसिंग दाजभाऊ सिसोदिया, दीपक पदमसिंग राजपूत व ग्रामसेवक पी बी सोनवणे उपस्थित होते तसेच कार्यक्रमास डॉ संदीप गिरासे डॉ राष्ट्रपाल अहिरे डॉ आरती चित्ते, क्षयरोग पर्यवेक्षक श्री धनराज पवार उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!