*गणेशोत्सवात मंडळांनी डी जे ऐवजी पारंपारिक वाद्याचा वापर करावा-उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवने*
शिंदखेडा प्रतिनिधी – भूषण पवार
शिंदखेडा : – पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच पोलीस पाटील यांच्या बैठकीचे आयोजन शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आज सायंकाळी शिंदखेडा पोलीस स्टेशन आवारात पाच वाजता घेण्यात आली. यावेळी सात सप्टेंबर पासून गणेश उत्सव साजरा केला जाणार आहे गणेश उत्सवात प्रत्येकाने डीजे चा वापर न करता पारंपारिक वाद्यांचा वापर करण्याचा प्रयत्न करावा सर्वोच्च न्यायालयाने दिलेले ध्वनी प्रदूषणाचे नियम प्रत्येक मंडळाने पाळावेत नियमांच्या चौकटीत राहून उत्सव साजरा करावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी भागवत सोनवणे यांनी गणपती मंडळाच्या बैठकीत केले. याप्रसंगी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात पीडब्ल्यूडी चे भामरे साहेब महावितरण कंपनीचे मराठे,नायब तहसीलदार वाघमारे यावेळी उपस्थित होते.
यावेळी अरुण देसले ,प्रकाश चौधरी ,विरोधी पक्षनेता सुनील चौधरी, निरंजन वेदे ,भाजपचे जिल्हाचिटणीस प्रवीण माळी यांनी मनोगत व्यक्त केले.
वक्त्यांनी यावेळी महावितरण कंपनीने गणेश उत्सव दरम्यान विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी केली.तसेच महावितरण व पीडब्ल्यूडी विभाग यांच्या गलथान कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली. विभागीय पोलीस अधिकारी यांनी महावितरण व इतर अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावून त्यांना सूचना देऊन गणेश उत्सव दरम्यान कुठेही समस्या उद्भवू नये याबाबत सूचना दिल्या.तसेच उत्साही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचा वापर जपून करावा दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी तसेच मंडळाच्या पदाधिकारी यांनी सीसीटीव्ही लावून प्रशासनास सहकार्य करावे शासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करून मंडळांनी गणेश उत्सव दरम्यान कुठेही गालबोट न लागता साजरा करावा दिलेल्या वेळेत विसर्जन करण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले यावेळी शांतता कमिटीचे सदस्यांनी शहरातील उत्सव शांतता प्रिय उत्साहात साजरा करण्याचे आश्वासन दिले यावेळी शांतता कमिटीचे सदस्य गणेश मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.