हक्काचा शंभर टक्के पगार मिळवण्यासाठी धुळे जिल्ह्यातील शिक्षक २२ जुलैपासून करणार आंदोलन
धुळे :- राज्यातील अंशत: तथा विनाअनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी आजपर्यंत 300 च्या वर आंदोलन करूनही त्यांना हक्काचा शंभर टक्के पगार मिळत नसल्याने राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालय व शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय समन्वयक संघाच्या वतीने घेण्यात आला त्याचप्रमाणे धुळे जिल्ह्यातील शिक्षकांनी आज दिनांक 18 जुलै रोजी धुळे जिल्हाधिकारी व शिक्षण अधिकारी यांना निवेदन देऊन 22 जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना 1 जानेवारी 2024 पासून विना अट प्रतिवर्षी वाढीव टप्पा लागू करणे
माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी 9 नोव्हेंबर 2023 रोजी आझाद मैदानावर येऊन दिलेला शब्द पाळणे
12 जुलै 2024 रोजी शिक्षण मंत्री यांची टप्पा वाढ अनुदानावर केलेली घोषणा याबरोबरच राज्यातील पुण्यस्तरावरील घोषित घोषित शाळांना अनुदानास पात्र करून अनुदान मंजूर करणे
30 जुलै 2024 पर्यंतचा टप्पा वाढसह आणि मागण्यातील शासन आदेश निर्गम करून आचारसंहितापूर्वी किमान एक महिन्याचा वाढीव टप्पा पगार शिक्षकांच्या खातात जमा करून याचा शासन आदेश निर्गमित करणे
जोपर्यंत ह्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन चालू राहील शासन निर्णय घेत नसल्यास राज्यभरातील ही सर्व आंदोलने एक ऑगस्ट 2024 पासून आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करणार आहेत ती वेळ शासनाने येऊ देऊ नये तत्पूर्वीच वेतन अनुदानाचा वाढीव टप्प्याचा व प्रतिवर्षी नैसर्गिक टप्पा वाढ चा शासन आदेश निर्गमित करून शिक्षकांना न्याय द्यावा अशा प्रकारचे निवेदन धुळे जिल्ह्याच्या शिक्षक समन्वय संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले यावेळी धुळे जिल्ह्यातील उदयजी तोरवणे,प्रकाशजी मराठे,ओमप्रकाशजी सुर्यवंशी,जयपाल देशमुख,शेखर बागुल,चेतन भामरे,राम पाटील,महेंद्र बच्छाव,कैलास पवार,अमृतकर सर,योगेंद्र पाटील,भुषण मोरे,अलिम खान,अशपाक खाटिक,दिपक पाटील,अरूण पाटील,प्रभाकर वाघ,भटू राजे पाटील,अरविंद पाटील,श्रीमती राजेश्वरी पाटील मॅडम,श्रीमती बी.एन.पाटील,श्रीमती आर.एन.पाटील,श्रीमती बी.आर.शिंदे, सिराज अन्सारी,अमिन शेख, खलिल अन्सारी,तुषार शिंदे, समाधान पाटील,अरूण मासुळे,एन.पी.गवळी,संदिप आखाडे,मोहम्मद काफिल, आशिफ इकबाल, जाहीद हुसेन,वाय.बी.पाटील,एस.एम.पटील,आर.एस.पानपाटील,विजय गिरासे, प्रविण भदाणे, पवन सुर्यवंशी,दृष्यंत वाघमारे,कमलेश पाटील,पवन पाटील,अमोल आव्हारे,दिलीप खैरनार,विजय पाटील,जयेश सोनवणे,योगेश पाटील,कमलेश देसले,अविनाश जगताप,नितीन नांद्रे,विजय कोकणी,प्रकाश चौधरी,महाजन सर,असंख्य शिक्षक समन्वयक उपस्थित होते.