21.4 C
New York
Thursday, September 19, 2024

Buy now

आण्णासाहेब एन.डी.मराठे विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न,,,,

✍️✍️🚥🚥✍️✍️

प्रतिनीधी – भूषण पवार


शिंदखेडा:  – शहरातील आण्णासाहेब एन. डी. मराठे विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमास ॲड. वसंतराव पवार, डॉ. सुजय पवार, संस्थेचे अध्यक्ष श्री साहेबरावजी मराठे व मुख्याध्यापक श्री अमोल मराठे उपस्थित होते.

शालेय जीवनात अभ्यासासोबत विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक व भावनिक विकास व्हावा यासाठी शालेय व आंतरशालेय स्तरावर विविध स्पर्धा व नाविन्यपूर्ण उपक्रमांचे व कार्यक्रमांचे आयोजन होत असते. यात विद्यार्थी मोठ्या आनंदाने व उत्साहाने सहभागी होतात व आपल्या अंगभूत कलागुणांचे प्रदर्शन करतात व स्पर्धांमध्ये यश मिळवतात.


अशा यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक व्हावे व त्यातून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ हे प्रेरणादायी असतात, असे मत यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अमोल मराठे यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केले.


या बक्षीस वितरण समारंभात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये झालेल्या विविध प्रकारच्या शालेय स्पर्धांमध्ये साधारणतः ३०० बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पदकांचे वितरण करण्यात आले. सोबतच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाग घेतलेल्या शाळाबाह्य स्पर्धांचे देखील बक्षीस वितरण याप्रसंगी झाले. शाळेतील विद्यार्थी हे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन तालुका व जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धा व विविध सेवाभावी व सामाजिक संघटनांनी आयोजित केलेल्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होतात व बक्षीस पात्र ठरतात.

अशा विजेत्या विद्यार्थ्यांचा देखील याप्रसंगी गुणगौरव करण्यात आला.
आजच्या या बक्षीस वितरण समारंभासोबतच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत शाळेला जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाल्याच्या निमित्ताने आनंदोत्सव देखील साजरा करण्यात आला. शाळेला मिळालेल्या सन्मान चिन्हांसोबत विद्यार्थ्यी व पालकांनी आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी काढत आनंद व्यक्त केला. आजच्या कार्यक्रमाला पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. बक्षीस वितरण समारंभात वर्षभर झालेल्या विविध कार्यक्रमांचे अहवाल वाचन विद्यालयातील उपशिक्षक एच. डी. कापुरे व उपशिक्षिका टी. बी. देवरे यांनी केले, तर सूत्रसंचालन एन.एस. सोनवणे व एस. ए. पाटील यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!