spot_img
spot_img

भावेश्वर महादेव मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तीमय वातावरणात सांगता; मान्यवरांचा ग्रामस्थांकडून सत्कार

मालपुर  :- आसाने ता.जि.नंदुरबार येथील भावेश्वर महादेव मंदिरात आयोजित अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाची आज भक्तीभावात सांगता करण्यात आली. सात दिवस चाललेल्या या सप्ताहात हरिनामाच्या गजरात परिसर दुमदुमून गेला होता. कीर्तन, प्रवचन आणि भजनांच्या माध्यमातून भक्तीचा महापूर उसळला होता.
सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमावेळी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली. धुळे जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती श्री महावीर सिंह रावल, व्हाईस ऑफ मीडिया शिंदखेडा तालुका अध्यक्ष प्रदीप दिक्षित, लोकवृत्त मराठी चॅनलचे संपादक भूषण पवार, ज्ञानोपासक विद्यालय मालपुरचे मुख्याध्यापक व सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार सदाशिव भलकार, पत्रकार एम. आर. माळी, माजी सरपंच तुकाराम पांडुरंग माळी, आवाज न्यूज 24/7 चे रिपोर्टर मुरलीधर महाजन, सामाजिक कार्यकर्ते उत्तम आण्णा व रघुनाथ बोराणे,तसेच आक्काबाई धनराज माळी,शोभाताई पाटील,वंदे महाराष्ट्रचे रिपोर्टर गायत्री पाटील आणि दैनिक समिकरणचे नंदुरबार तालुका प्रतिनिधी आसाणे आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा आसाणे ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतात मान्यवरांनी हरिनाम सप्ताहासारख्या धार्मिक उपक्रमांमुळे समाजात एकोपा, सद्भावना आणि नैतिक मूल्यांची जपणूक होते, असे मत व्यक्त केले.
सप्ताहाच्या निमित्ताने गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आयोजन समितीने केलेल्या नियोजनबद्ध व्यवस्थेचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
भावेश्वर महादेवाच्या साक्षीने हरिनामाचा अखंड गजर करत सप्ताहाची सांगता भक्तीभावात संपन्न झाली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!