- *जातीचे विष पेरणाऱ्या विरोधकांना जबरदस्त दणका.!*
*मराठा पाटील बहुल गावांमध्ये जयकुमार रावल यांना मिळाले मोठे मताधिक्य..*
*विकासाभिमुख सर्वसमावेशक नेतृत्व असल्याचे जनतेने केले सिद्ध*
शिंदखेडा :- विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली यात शिंदखेडा मतदारसंघातून आ.जयकुमार रावल हे एक लाखाच्या आसपास मताधिक्याने मिळवीत सलग पाचव्यांदा निवडून येत इतिहास घडविला. या निवडणुकीत ध्रुवीकरणासाठे विरोधकांनी तीव्र जातीवाद केला, अत्यंत खालच्या स्तराला जावून जातीय विष पेरण्याचे काम विरोधातील नेत्यांनी केले परंतु शिंदखेडा तालुक्यातील जनता अत्यंत सुज्ञ असून विरोधकांच्या जातीवादाला स्पष्टपणे नाकारले, अनेक मराठा पाटील बहुल गावांत जयभाऊंना मोठे मताधिक्य मिळाले.
यात १०० टक्के मराठा पाटील समाजाचे असलेले मेलाणे गावात ४०२ पैकी ३६५ मते अर्थात ९० टक्के मते जयभाऊंना मिळाली, विरोधातील संदीप बेडसे ना केवळ २८ मते मिळाली. मागील पंचवार्षिक निवडणुकीत जयभाऊंपेक्षा विरोधी उमेदवाराला २५० मते जास्त होती अश्या कमखेडा गावात यावेळी ५६४ मतांचा लीड व ६५ टक्के जयभाऊंना मिळाली, असच चित्र असलेल्या वारुड गावात यावेळी जयभाऊंना १५५३ मतांचा लीड मिळाला आणि झालेल्या मतदानाच्या ८२ टक्के मतदान जयभाऊंना झाले, पाष्टे येथे ६७ टक्के मतदान जयभाऊंना झाले, माळीच गावात ७५ टक्के मते जयभाऊंना मिळाली, म्हळसर गावात ५०० मतांचा लीड मिळाला, होळ, दत्ताणे, गव्हाणे, दभाषी या गावातही ७० टक्के मते जयभाऊंना मिळाली. पश्चिम पट्ट्यात मराठा पाटील बहुल अश्याच बहुतांश गावात मोठे मताधिक्य जयभाऊंना मिळाली. कर्ले, निमगुळ, इंदवे, मांडळ या मराठा समाज बहुल गावातही जयभाऊंना मोठी आघाडी मिळाली.
मराठा पाटील समाजा सोबतच १२ बलुतेदार व १८ पगड जाती, आदीवासी, दलित अश्या सर्वच समाजांनी जयभाऊंना मोठे मताधिक्य दिले. यात बेटावद, मालपुर, वर्षी, हाट्टी, बळसाणे, रेवाडी, सोनशेलु अश्या बहुतांश गावात जयभाऊंना एकतर्फी मते मिळाली. पूर्ण आदीवासी समाजाचे असलेल्या भिलाणे गावात जयभाऊंना ९९ टक्के मते मिळाली. कोळी समाज बहुल असलेल्या चांदगड, झोतवाडे, साहुर, शेंदवाडे अश्या गावे ही एकतर्फी जयभाऊंच्या बाजूने भक्कमपणे उभी होती. दोंडाईचा शहरातही जयभाऊंना तब्बल १० हजार मतांचे मताधिक्य मिळाले.
एकूणच बहुसंख्य असलेला मराठा पाटील समाजाबरोबरच, बारा बलुतेदार, अठरा पगड जाती, आदीवासी, दलित अश्या सर्वच समाजांनी जयभाऊंना एकतर्फी मते देवून जयभाऊ हे सर्व समाजांना सोबत घेवून जाणारे सर्वसमावेशक नेतृत्व असल्याचे जनतेने सिद्ध करून देत विरोधकांना जबर अशी चपराक दिली आहे.
( टीप: शिंदखेडा मतदारसंघातील बहुतेक गावांत मा.आ जयकुमार रावल यांना मोठे मताधिक्य मिळाले आहे परंतु उदाहरणासाठी काही गावांचा उल्लेख केला आहे)