*अपंगत्वावर मात करत योगेश गुरव करताहेत शेकडो पोलीस बांधवांची सेवा*
विखरण (देवाचे ) यात्रोत्सव बंदोबस्तावर असलेल्या पोलीस बांधव व सैनिकांसाठी मोफत अन्नदानाचे कार्य
गुरव परिवाराचा अभिनव उपक्रम
शिंदखेडा :- एका पायाने अपंग असताना देखील अपंगत्वावर मात करत जिद्दीने स्वयंरोजगारातून आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर उभा राहून अपंगत्वाचे भांडवल न करता स्वावलंबी व स्वाभिमानी जीवन जगणाऱ्या या जिद्दी दिव्यांग व्यक्तीने आपण समाजाचे काही देणे लागतो या उदात्त हेतूने विखरण (देवाचे ) गावात कार्तिकी एकादशी निमित्ताने मोठी यात्रा भरते या यात्रोत्सव काळात बंदोबस्तासाठी आलेल्या शेकडो पोलीस बांधवाना व भारत सीमा पोलीस दलातील जवानांना सकाळी चहा ,नाश्ता ,दुपारचे व रात्रीचे जेवणाची उत्तम सोय उपलब्ध करून एक आदर्श निर्माण करून त्यांची जिद्द व प्रेरणादायी प्रवास धडधाकड माणसाना देखील प्रेरणादायी ठरत असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून .गुरव परिवाराने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे .
तालुक्यातील विखरण (देवाचे ) या गावात कार्तिकी एकादशी निमित्ताने दि ११ नोव्हेंबर पासून द्वारकाधीश भगवान यांच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली.यावेळी यात्रोत्सव काळात दोंडाईचा पो .स्टे.अंतर्गत बंदोबस्त कामी गृहरक्षक दलासह ,पोलीस प्रशासन ,यांसह भारत तिबेट सीमा पोलीस दलाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते .या पोलीस प्रशासनाची भूक भागविण्यासाठी गेल्या चार वर्षापासून आपल्या अंगणात मंडप टाकून शेकडो पोलीस कर्मचारी व अधिकारी यांची निस्वार्थ भावनेने आपल्या स्व खर्चातून चहा ,पाणी ,नाश्ता ,दोन वेळेचे शेकडो अधिकारी व कर्मचार्यांना जेवण देण्याचा अभिनव उपक्रम अविरतपणे सुरु असून सदर कामात श्री योगेश गुरव यांच्या पत्नी ललिता गुरव ,मुली कामिनी ,नंदिनी ,योगिनी गुरव या आईला स्वयंपाकात मदत करत असतात व आपल्या हाताने त्यांना पोटभर जेवण देत असतात .चार दिवस चालणाऱ्या यात्रोत्सव काळात नित्यनियमाने हि सेवा हा परिवार करीत असतो .योगेश गुरव यांच्या मुली कामिनी व नंदिनी यांचे सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न असून बंदोबस्तावर असलेल्या पोलीस प्रशासनाची सेवा करण्यात त्यांना अत्यंत आनंद मिळत असतो. दिवसभर बंदोबस्तात व्यस्त असलेल्या पोलीस प्रशासनाची भूक भागवून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून मानसिक समाधान मिळत असल्याचे योगेश गुरव यांनी सांगितले .भगवान द्वारकाधीश यांच्या आशिर्वादाने मला पोलीस बांधवांची निस्वार्थ भावनेने सेवा करण्याची संधी माझ्या सारख्या दिव्यांग व्यक्तीला प्राप्त होते हा सर्वात मोठा आनंद असल्याचे देखील योगेश गुरव यांनी सांगितले.