spot_img
spot_img

अभूतपूर्व गर्दी, जोरदार शक्तीप्रदर्शन करत आ.जयकुमार रावल यांचा नामांकन अर्ज दाखल

*हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिंदखेडा येथे आ.जयकुमार रावल यांचा उमेदवारी अर्ज दाखल*

शिंदखेडा प्रतिनिधी भूषण पवार

शिंदखेडा : – शिंदखेडा मतदारसंघात आ.जयकुमार रावल यांनी महायुतीच्या वतीने भारतीय जनता पार्टी तर्फे आपला उमेदवारी अर्ज प्रचंड शक्ती प्रदर्शन करून दाखल केला. तालुक्यातून हजारो कार्यकर्ते शिंदखेडा शहरात दाखल झाली होती.कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे शहराला यात्रेचे स्वरूप आले होते.आ.जयकुमार रावल यांनी सर्वप्रथम आई श्री पेडकाई व आई आशापुरी मातेचे दर्शन घेतले.त्यानंतर बिजासनी मंगल कार्यालयातून भगवा चौक मार्गे तहसील कार्यालयात प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता पोहोचले.यावेळी कार्यकर्त्यांची सुमारे दीड किलोमीटर गर्दी झाली होती.असंख्य कार्यकर्ते डीजेच्या तालावर थीरकत होते. शिंदखेडा तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी महादेव खेडकर यांनी आमदार जयकुमार रावल यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारला.अर्ज दाखल केल्यानंतर शहरातील गांधी चौकात सभेचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी माजी मंत्री डॉ.सुभाष भामरे, जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, संजीवनी ताई सिसोदे, राम भदाणे, नारायण भाऊसाहेब आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी मंचावर माजी संरक्षण मंत्री सुभाष भामरे,जि प अध्यक्ष धरती देवरे, जिल्हाध्यक्ष बबन चौधरी,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, बाजार समिती सभापती नारायण पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र देसले, जि प गटनेत्या संजीवनी सिसोदे, शिंदखेडाचे माजी नगराध्यक्षा रजनीताई वानखेडे,गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे,माजी महापौर चंद्रकांत सोनार, राम भदाणे, जि प शिक्षण व आरोग्य सभापती ज्योती देवीदास बोरसे, महिला बालकल्याण सभापती सोनाली पंकज कदम,धुळे जिल्हा चिटणीस प्रवीण माळी,भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक बागल, उपनगराध्यक्ष भिला पाटील,शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष अनिल जगताप,दूध संघाचे चेअरमन रघुवीर बागल,प्रवीण महाजन,शिंदखेडा शहराध्यक्ष विनोद पाटील, दिनकरराव देवरे, पंस सभापती छाया गिरासे, उपसभापती दीपक मोरे, बाजार समिती उपसभापती प्रा.आर जी खैरनार,जि प सदस्य प्रभाकर पाटील, धनंजय मंगळे, भूपेंद्र गिरासे, माजी जि प उपाध्यक्ष भारत ईशी,माजी सभापती जिजाबराव सोनवणे, डॉ. दीपक बोरसे, किशोर रंगराव पाटील,माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले,माजी प स सदस्य सुभाष माळी, युवा मोर्चाचे सुरज देसले, तालुकाध्यक्ष बंटी बागूल,गोविंद मराठे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

मागील कार्यकाळात महाराष्ट्र राज्यात विकास कामांच्या गतीने आपल्या मतदार संघाचा चेहरा बदलला आहे,उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती हीच माझ्या कामाची पावती आहे.आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी १० ठिकाणी उपकेंद्रासोबतच नरडाणा येथे ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय,दोंडाईचा आणि शिंदखेडा अशा दोन्ही ठिकाणी १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय देखील मंजूर झाले आहे,त्यामुळे आता जनतेची चांगली सोय होणार आहे.१०० गावांना महादेव मंदिरे, ६० ठिकाणी मंदळाधिकारी व तलाठी कार्यालये मंजूर झाले आहेत.गेल्या वेळी शिंदखेडा मतदारसंघातील जनतेने ४५ हजाराच्या लीड ने विजय केले होते आता त्यापेक्षा ५५ ते ६० हजारांचा लीड देवून मला विजयी करतील असा विश्वास आहे.
आमदार जयकुमार भाऊ रावल

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!