पोलीस पाटलांनी ग्राम स्तरावर ग्राम सुरक्षा दल स्थापन करावे,,,,,,,
पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात
शिंदखेडा :- शिंदखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पोलीस पाटलांच्या बैठकीचे आयोजन आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता पोलीस स्टेशन आवारात करण्यात आले होते
यावेळी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी पोलीस पाटील हा महसूल तसेच गृह विभागाच्या महत्त्वाचा कना असून गावातील महत्वाची भूमिका बजावणारा महत्त्वाचा घटक आहे सध्या ग्रामीण भागात खेड्यापाड्यांमध्ये चोरीचे प्रमाण वाढले असून पोलीस पाटलांनी ग्रामस्थारावर प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा दल स्थापन करावे व यात 18 ते 40 वयोगटातील प्रत्येक समाजातील नवतरुणांना सहभागी घेऊन ग्राम सुरक्षा दल स्थापन करावे व दररोज आपल्या गावात आळीपाळीने रात्रीची बारा ते चार या वेळेत गस्ती करावी जेणेकरून आपले गाव सुरक्षित राहील यासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामसुरक्षा दलास पोलीस विभागातर्फे प्रशस्तीपत्र पत्र देऊन सन्मानित करण्यात येईल यासाठी पोलीस पाटलाला सुरक्षा दलाची मोलाची साथ मिळेल कारण आपल्या गावात येणारे बाहेरील विक्रेत्ये यांची आधार कार्ड बघून चौकशी करा तसेच बाहेरच्या व्यक्ती बाबत संशय आल्यास जवळच्या पोलीस स्टेशनचे संपर्क साधण्याचे आव्हान केल गावात ग्राम सुरक्षा दल स्थापन झाले तर तपास कामी मोठी मदत मिळते येणाऱ्या काळात निवडणुकीत पोलीस पाटलानी निपक्ष भूमिका बजवावे असे आव्हान थोरात यांनी पोलीस पाटलांच्या बैठकीला मार्गदर्शन करताना केले यावेळी गोपनीय विभागाचे कुणाल फुल पगारे रवींद्र ईशी डॉ महेंद्र पाटील भडणे येथील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी शिवाजी पाटील प्रदीप गिरासे यावेळी पोलीस पाटील बांधव व महिला पोलिस पोलीस व मोठ्या संख्येने उपस्थित होते
शिंदखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील पाटण गावाचे पोलीस पाटील अजय परदेशी यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला ये वेळी नवनियुक्त पोलीस पाटील यांनी पोलीस पाटलांचे मार्गदर्शन घेउन गावात कायदा सुव्यवस्था व शांतता आबाधीत राखावी यासाठी प्रयत्न करावे,,,,,,