*शिंदखेडा पोलिसांची धडक कारवाई – रज्जाक नगर येथे गोवंश जनावराची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्यास ठोकल्या बेड्या*
उपसंपादक -भूषण पवार
शिंदखेडा- : आज दिनांक 19/06/2024 रोजी सकाळी नऊ वाजता पोलीस निरीक्षक विजय ठाकूर व पोलीस कॉन्स्टेबल कुणाल फुलपगारे शासकीय वाहनाने पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करीत होते ,माळीवाडा परिसरातील रहिवासी विनोद भाऊराव देसले यांनी रज्जाक नगर परिसरात असलम हैदर शेख हे त्यांचे राहते घराच्या बाजूला असलेल्या पत्री शेडमध्ये गोवंश जनावराची कत्तल करून त्यांचे मास कब्जात बाळगून त्याची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगत आहे अशी माहिती पोलिसांना दिली.माहिती मिळताच दोन पंचाना सोबत घेऊन स.पोलीस निरीक्षक विजय ठाकूर व पोलीस कर्मचारी यांनी रज्जाक नगर परिसरात जाऊन ईसम नामे असलम हैदर शेख याचे राहते घराचा पत्ता विचारून सोबतच्या पंचांसह येथे गेले असता एका घराच्या समोर गर्दी जमा झालेली असल्याचे दिसल्याने सदर ठिकाणी सोबतच्या पंचांसह असलम हैदर शेख यांचे राहते घर बाबत विचारणा केली असता तेथे जमलेल्या इसमानी सदरचे घर हे असलम शेख याचेच असल्याचे सांगितले तेव्हा गर्दीतील विनोद भाऊराव देसले, केशव संतोष माळी,सुभाष नागो माळी, राजेंद्र नथू मराठे ,भूपेंद्र सिंग भरतसिंग राजपूत ,सुरेंद्र अशोक देसले, कुणाल गुलाब माळी ,रवींद्र माळी आणि इतर वीस ते पंचवीस जणांनी सदर घराचे बाजूला असलेल्या पत्री शेडमध्ये गोवंश जानवराची कत्तल केली असल्याचे सांगितले सोबतच्या पंचा समक्ष सदर पत्री शेडमध्ये जाऊन पाहिले असता तिथे एक गोवंश जनावर कत्तल केलेल्या तसेच काही भांड्यांमध्ये गोवंश मास सदृश्यमासांचे तुकडे भरलेल्या स्थितीत दिसून आले त्यानंतर सपोनी विजय ठाकूर यांनी सदरची माहिती मा वरिष्ठांना कळविले. पोलीस निरीक्षक दीपक पाटील हे पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी आले नंतर सदर ठिकाणी व गोमासची कटाई करताना मिळून आलेल्या इसमास पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी पंचा समक्ष त्यांचे नाव विचारले असता त्याने त्यांचे नाव अस्लम शेख हैदर शेख राहणार रज्जाक नगर शिंदखेडा असे असल्याचे सांगितले सदर इसमास पोलीस निरीक्षक यांनी गोमास बाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की ,अश्फाक हमीद कुरेशी, साजिद हमीद कुरेशी ,दोन्ही राहणार कुरेशीवाडा शिंदखेडा शेख जहांगीर शेख हैदर राहणार रज्जाक नगर शिंदखेडा अशांचे मदतीने मी गोवंशाची कटाई करीत होतो परंतु पोलीस येत असल्याची चाहूल लागल्याने ते तेथून पळून गेले आहेत अशी हकीगत सांगितली यावेळी पोलीस निरीक्षक यांनी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन अधिकारी यांच्याशी संपर्क साधला त्यांच्या आदेशान्वये सदर ठिकाणी पशुधन विकास अधिकारी संकेत पूपलवार हे आले त्यांनी घटनास्थळी मिळून आलेल्या गोमांस सदृश्यमासांची घटनास्थळीच तपासणी करून ते गोमांस असल्याचे सांगितल्याने नमूद पंच समक्ष सदरचे गोमास ताब्यात घेतले त्याचे वर्णन खालील प्रमाणे 3000 रुपये की चे 30 किलो वजनाचे गोवंश जातीचे गोमाश सदृश्य मास आढळले
येणेप्रमाणे वरील वर्णनाचे गोवंश जातीचे गोमास सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर यांनी दोन पंचा समक्ष ताब्यात घेतले नंतर त्यातील गोमा सदृश्यमास पैकी काही मास हे पशुधन विकास अधिकारी संकेत पुपलवार यांनी नमुन्या करिता घेतले नंतर उर्वरित गोमास सदृश्यमास व इतर साहित्य पंचासमक्ष पंचनामा करून पोलीस स्टेशनला आणले गेले.तरी आज दिनांक 19 /6 /2024 रोजी असलम शेख हैदर शेख राहणार रज्जाक नगर शिंदखेडा अश्फाक अमित कुरेशी,साजिद हमीद कुरेशी दोन्ही राहणार कुरेशी वाडा शिंदखेडा शेख जहांगीर शेख हैदर राहणार रज्जाक नगर शिंदखेडा अशांची मदतीने गोवंश जनावराची कत्तल करीत असताना पोलीस येत असल्याची चाहूल लागल्याने सदर घटनास्थळावरून अश्फाक हमीद कुरेशी,साजिद हमीद कुरेशी, शेख जहांगीर शेख हैदर हे तिथून पळून गेले तसेच इसम नामे अस्लम शेख हैदर शेख हा गोमांस सदृश्यमासांची चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगताना मिळून आला म्हणून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 व महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम सन 2015 चे कलम 5,5ब ,5क सहकलम 9 प्रमाणे फिर्याद नोंदविली गेली आहे.
रज्जाक नगर येथून 2 गोवंश जातीचे जनावर ताब्यात घेण्यात आले आहे.
गोवंश चे ताब्यात घेण्यात आलेले मांस जेसीबीच्या साह्याने जमिनीत पुरून देण्यात आले यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरक्ष विभाग यांच्या वतीने गोमातेस साडी,पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.प्रसंगी स.पो.निरीक्षक विजय ठाकूर पोलीस कॉन्स्टेबल चेतन माळी व गोरक्षक उपस्थित होते.