16.6 C
New York
Thursday, October 10, 2024

Buy now

चक्क महिलेचे कपडे परिधान करुन घरफोडी – नंदूरबार स्थानिक गुन्हे शाखे कडून अटक,,,

प्रतिनीधी – प्रविण चव्हाण

नंदुरबार  -:   05 जुन सायंकाळी ते दि.06 जुन 2024 रोजी सकाळी 07.15 वा. सु. नंदुरबार शहरातील विमल प्लाझा कॉम्प्लेक्स मधील गुरूकृपा ज्वेलर्स येथे अज्ञात चोरटयांनी 5,64,300/-रु. किंमतीचे चांदीचे दागिने फिर्यादीचे संमती शिवाय लबाडीच्या इरादयाने चोरुन नेले म्हणून संजय हिरालाल सोनी (43) धंदा- व्यापार रा. महाविर कॉलनी बंगला क्र. 16 नंदुरबार यांचे तक्रारी वरून उपनगर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 216/2024 भा.दं.वि.कलम 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखे मार्फत तपास सुरु असतांना दिनांक 14 जुन 2024 रोजी पो.नि. किरणकुमार खेडकर यांना गुप्त बातमी मिळाली की, सदर गुन्हा हा नंदुरबार शहरातील बंटी, रा.CB पेट्रोल पंपाच्या मागे याने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने केला असून तो सद्या एकटा CB पेट्रोल पंप परिसरात फिरत आहेत.
सदर मिळालेल्या बातमी वरुन पो.नि. किरणकुमार खेडकर, स पो नि दिनेश भदाणे, पो उनि- मुकेश पवार, विशाल नागरे, मोहन ढमढेरे, अभय राजपुत, आनंदा मराठे असे संशयित इसमांचा शोध घेणे कामी रवाना झाले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने CB पेट्रोल पंप परिसरात जावून संशयित इसम बंटी याचा शोध घेतला असता तो मिळून आला त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता तो विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याचे समजले.
त्यास त्याच्या पालकांसमक्ष उपरोक्त घटने बाबत विचारपूस केली असता त्याने त्याच्या साथीदार दिपक ऊर्फ भुत्या भिका पाडवी, (19 ) रा. वाघोदा ता.जि. नंदुरबार याचे मदतीने महिलांचे कपडे परिधान करुन रात्रीच्यावेळी दागिने चोरी केले बाबत सविस्तर माहिती दिली.
ताब्यात घेण्यात आलेला विधी संघर्षग्रस्त बालक व दिपक ऊर्फ भुत्या यांनी सदर गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल हा नंदुरबार शहरातील नदीम ऊर्फ गोल्डन यास विक्री केल्याचे सांगितले. त्याअन्वये स्थानिक गुन्हे शाखेचे एका पथकाने शहरातील कुरैशी मोहल्ला परीसरात सदर व्यक्तीचा शोध घेतला असता सदर नदीम शेख ऊर्फ गोल्डन रहीम मेहतर (33) रा. बिस्मील्ला चौक, कुरैशी मोहल्ला, नंदुरबार हा मिळून आला.
सदर इसमांना उपनगर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले असून पुढील अधिक तपास पोउनि अनिल गोसावी, उपनगर पोलीस ठाणे हे करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस अधिक्षक श्रवण दत्त.एस,अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदूरबार उपविभागीय पोलीस अधीकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली L C B पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, तसेच विशाल नागरे, मोहन ढमढेरे, अभय राजपुत, आनंदा मराठे यांनी केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!