✍️✍️🚥🚥✍️✍️
प्रतिनीधी – भूषण पवार
शिंदखेडा :- जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा येथे SVEEP – मतदार जन जागृती अभियांना अंतर्गत विविध प्रकारचे उपक्रम हे घेण्यात आले यात सर्व विद्यार्थ्यांना वय वर्ष 18 असलेल्यांनी मतदान जनजागृती विषयी महत्व पटवून देण्यात आले आज मतदानाचे महत्त्व हे किती आहे व वय वर्ष 18 असलेल्या सर्वांनी मतदार यादीत आपले नाव नोंदणी करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे याबद्दल सखोल माहिती विद्यालयातील उपशिक्षक श्री. एस ए पाटील सर व श्री. जतीन बोरसे सर यांनी दिले त्याचप्रमाणे रांगोळी स्पर्धेचे देखील आयोजन हे करण्यात आलेले होते विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीच्या अतिशय सुंदर रांगोळ्या रेखाटल्या होत्या त्यांना कलाशिक्षक श्री. एल. पी. सोनवणे यांनी मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे भव्य मतदान जनजागृती रॅली चे आयोजन देखील करण्यात आलेले होते “एका मताने बनते, सरकार एका मताने पडते सरकार” व “घरोघरी साक्षरता घेऊन जाऊ, मतदात्यांना साक्षर बनवू” असे अनेक घोषवाक्य विद्यार्थ्यांनी दिले तसेच रॅलीत सर्व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला व उत्साहात रॅली ही काढण्यात आली यात विद्यालयाची उपशिक्षक श्री जतीन बोरसे सर यांनी सदर आयोजन हे केले होते याप्रसंगी मतदान जनजागृती कार्यक्रमास शाळेच्या प्राचार्या श्रीमती एस. एस. बैसाणे, पर्यवेक्षक श्री. उमेश देसले, वरिष्ठ लिपिक बापूसो श्री. किशोर पाटील त्याचप्रमाणे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते