चिमठाणे परिसरातील रस्त्याची दुरवस्था बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष
5 डिसेंबर रोजी महेंद्र पाटील सह चिमठाणे परिसरातील नागरिक करणार रस्ता रोको जण अदोलन
सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या कडे तक्रार दाखल करणार महेंद्र पाटील यांचा इशारा
चिमठाना :- चिमठाणे गावतील अनेक दिवसांपासून रस्त्याची दुरवस्था झाली असुन सदर रस्त्याचे काम पूर्णपणे झाले असून परंतु या रस्त्याचे काम अतिशय नित्कृष्ठ दर्जा चे असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून कोटी रुपयांचा निधी शासनाने दिला परंतु रस्त्याचे काम बरोबर करण्यात का आले नाही तसेच रस्त्याच्या कामाला 2 वर्ष झाले असून तरी दोन वर्षा मध्ये रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून तक्रारदार महेंद्र गोकुळ पाटील (उर्फ सोनू फौजी) यांनी वेळोवेळी बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी पत्रव्यवहार करून देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने ह्या गोष्टी कडे कुठल्या ही प्रकारे ह्या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तसेच वेळोवेळी या गोष्टीचा महेंद्र पाटील यांनी सदर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तोंडी स्वरूपात देखील माहिती दिली असता परंतु फक्त काम लवकरच करू असे आश्वासन दिले प्रत्यक्ष मात्र अद्याप स्पष्ट रस्त्याचे काम 2 महिन्यात झाले नाही तसेच ठेकेदार व इंजिनिअर तसेच बांधकाम विभाग याचे काही तरी मोठे साठे लोटे असल्याचे स्पष्ट उघडपणे चित्र दिसत असून सदर तक्रार दाखल केल्या नंतर 2 महिने झाले तरीही कुठल्या प्रकारे बांधकाम विभागाने सदर ठेकेदार व इंजिनिअर यांच्या वर कुठल्या प्रकारची कार्यवाही का केली गेली नाही व ज्या ठेकेदारने व इंजिनिअर यांनी हर काम केले आहे त्याचे परवाने कायमस्वरूपी रद्द करून सदर प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी चिमठाणे परिसरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील यांनी केला आहे.
मी अनेक दिवसांपासून बांधकाम विभाग यांना संबंधित अधिकारी यांना पत्रव्यवहार करून देखील बांधकाम विभागणे कुठल्याही प्रकारचे रस्त्याच्या कामाच्या बाबतीत तक्रार कडे लक्ष दिले नाही संबंधित ठेकेदार व इंजिनिअर याच्या वर आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही म्हणून चिमठाणे परिसरातील नागरिकां सह उद्या चिमठाणे चौफुली वर रस्ता रोको जण आंदोलन करणार असून तरी प्रशासनाला अगोदर तसे कळविले असून चिमठाणे परिसरात कायदा सुव्यवस्थाचे प्रश्न निर्माण होऊ नये यांची प्रशासनाने दखल घ्यावी ही नम्र विनंती करतो.
समाजिक कार्यकर्ते महेंद्र गोकूळ पाटील चिमठाणे







