शिंदखेड्यात संघाच्या शताब्दी वर्षेनिमित्ताने पथसंचलन
शिंदखेडा :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण होत असल्याने दि. ४ ऑक्टोंबर २०२५ या दिवशी विजयोत्सव, पथसंचलन,शस्त्र पूजन व प्रकट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन मंडळ धुळे जिल्हा समन्वयक बन्सीलाल सोनवणे, सेवानिवृत्त प्राचार्य रजेसिंग राजपूत तर प्रमुख वक्ते धुळे जिल्हा महाविद्यालय विभाग प्रमुख नितीन चौधरी आहेत.
अशी माहिती तालुका कार्यवाह विनोद देसले यांनी दिली आहे.
संघउत्सव, पथ संचलनाची सुरुवात येथील जाधव नगर भगवा चौक पासून सायंकाळी ४ वाजता सुरू होईल. गावातील छत्रपती शिवाजी चौफुली, तहसील कार्यालय चौक, गांधी चौक, रथ गल्ली, शनी मंदिर मार्गे शिस्तबद्ध पथ संचलन होऊन सायंकाळी ५:४५ वाजता जनता हायस्कूल येथे धुळे जिल्हा महाविद्यालय विभाग प्रमुख नितीन चौधरी यांचे व्याख्यान होणार आहे. स्वयंसेवकांनी पथसंचलनासाठी गणवेशात उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका संघचालक डॉक्टर सुजय पवार यांनी केले आहे.