spot_img
spot_img

*शिंदखेडा तालुका विज्ञान व गणित संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर

शिंदखेडा तालुका विज्ञान व गणित संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर.
(श्री. एस. एन. माळी अध्यक्ष तर श्री. अतुल पाटील यांची सचिव म्हणून वर्णी).
.

प्रतिनिधी – भूषन पवार

शिंदखेडा :-  येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे शिंदखेडा तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघाच्या नवीन कार्यकारणीची एकमताने निवड करण्यात आली.यात धुळे येथे कार्याध्यक्ष श्री. संजय पवार,यांच्या अध्यक्षतेखाली तसेच श्री. पी. झेड. कुवर यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या सहविचार सभेत तालुकाध्यक्ष म्हणून आस्तिक मुनी माध्यमिक विद्यालय वर्षीचे मुख्याध्यापक श्री. सुधाकर माळी यांची तर जनता हायस्कूल चे उपशिक्षक श्री. अतुल तुकाराम पाटील यांची सचिव म्हणून एकमुखाने निवड करण्यात आली होती. परंतु उर्वरित कार्यकारी ची निवड बाकी असल्याने तालुका विज्ञान व गणित शिक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आली.
सदर कार्यक्रम प्रसंगी धुळे विज्ञान संघाचे माजी उपाध्यक्ष श्री. एस. एन. पाटील जिल्हाउपक्रम प्रमुख श्री. एस. एस. गोसावी, माजी तालुका अध्यक्ष श्री. आर. ए. चित्ते कार्याध्यक्ष श्री. जे. डी. भदाणे यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी मागील कार्यकारणी बरखास्त करत नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली यात अध्यक्ष म्हणून श्री.सुधाकर माळी, उपाध्यक्ष श्री. एन. एम. पाटील,श्री निलेश मालपूरकर, सचिव श्री. ए.टी.पाटील, कार्याध्यक्ष श्री. आर. ए. चित्ते सल्लागार श्री. एस. एस. गोसावी,श्री जे. डी. भदाणे, प्रसिद्धीप्रमुख श्री. जे. आर. गिरासे तर सभासद म्हणून श्री. एस. एन. पाटील,श्री. ए. सी. मारणार,श्री. ए. पी. चंद्रा ,श्री. व्हि.पी. जाधव,श्री. आर. डी. गिरासे,श्री. व्ही. आर. अहिरे, श्री. डी. एस. धनगर,श्री मयूर पाटील,श्री सद्दाम शेख,श्री आर.बी.मोरे,श्री किरण भदाणे यांची तर महिला प्रतिनिधी म्हणून श्रीमती वहिदा खान, श्रीमती शर्मिष्ठा निकम यांची निवड करत सर्व नवनिर्वाचित मंडळाचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मावळते तालुकाध्यक्ष श्री रविंद्र चित्ते, श्री. एस. एस. गोसावी ,श्री जे.डी.भदाणे,यांनी नवनिर्वाचित कार्यकारणीला मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच नवनिर्वाचित विज्ञान संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री. संजय पवार मा.अध्यक्ष श्री. पी. झेड. कुवर यांनी अभिनंदन केले.
सूत्रसंचालन विज्ञान संघांचे सचिव ए.टी.पाटील यांनी तर मान्यवरांचे आभार श्री ए.सी.मारणार यांनी मानले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!