शिंदखेड्यातील सा.बां.विभागालगत असलेल्या रस्त्यावर उघड्यावर शौच करणाऱ्यांवर कार्यवाही होऊन रस्त्याची ससाफसफाई करावी-
युवकांचे नगरपंचायतीला निवेदन
शिंदखेडा :- येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय लगतचा रस्त्यावर उघड्यावर शौच करणाऱ्यांवर कार्यवाही होऊन रस्त्याची साफसफाई करावी या आशयाचे निवेदन मुख्याधिकारी श्रीकांत फागनेकर यांना शहरातील युवकांनी दिले. याबाबत लवकर योग्य ती कार्यवाही होऊन रस्त्याची साफसफाई करण्यात येईल असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले.
सविस्तर वृत्त असे को, वरपाडे रोडवरील, सार्वजनिक बांधकाम विभागाला लागून असलेल्या रस्त्यावर मोठया प्रमाणावर उघड्यावर शौच करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे परिसरात मोठया प्रमाणावर दुर्गंधी पसरत असून आजाराचे प्रमाण देखील वाढले आहे. तसेच या रस्त्यावरून अमरधाम येथे जाण्याचा मार्ग आहे. शहरातील नागरिकांना अंत्यविधीसाठी याच मार्गाने जावे लागते. या रस्त्यावर उघड्यावर शौच केले असल्याने अंतविधीसाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
केंद्रशासन व राज्यशासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वछता पंधरवाडा संपूर्ण भारतात साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदखेडा नगर पंचायतीने देखील पंधरवाडा साजरा करून “गुड मॉर्निंग” पथक नियुक्त होऊन सार्वजनिक बांधकाम विभाग लगतचा रस्त्याची तात्काळ स्वच्छता करून उघड्यावर शौच करणाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर रोहित पाटील, राजेंद्र मराठे, जीवन देशमुख, मुकेश बडगुजर, बबलू खाटीक, अबरार तेली यांच्या सह्या आहेत.