तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत व्ही.के.पाटील इंटरनॅशनल स्कूलचा संघ विजयी
शिंदखेडा प्रतिनिधि – भूषन पवार
शिंदखेडा :- क्रीडा व युवक सेवा संचालनया मार्फत तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,धुळे व स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.10/09/2025 रोजी तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात 17 वर्षे आतील वयोगटात व्ही.के. पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या मुलींच्या संघाने चमकदार कामगिरी करत अंतिम सामन्यात बेटावद येथील फ.मू. ललवाणी माध्यमिक विद्यालयाचा पराभव करत दिमाखदार विजय मिळवला. विजयी संघाची आगामी धुळे येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजयी संघ खालील प्रमाणे दर्शना पाटील(कर्णधार) सेजल देसले, हीतेश्री पवार, साक्षी परमार, अश्विनी कोळी, जानवी सूर्यवंशी, हंसिका चौधरी, गौतमी आखाडे, दिक्षिता चौधरी, निवेदिता पाटोळे, मैथिली महिरे आदी खेळाडूंचा समावेश होता. खेळाडूंच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या अध्यक्षा मा. मीनाताई पाटील उपाध्यक्षा मा. स्वाती पाटील संचालिका मा. काजल पाटील व मा.माधुरी पाटील तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री.मनोज पाटील व अकॅडमी सीईओ श्री.मंगेश पवार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. सदर विजयी संघास विद्यालयाचे क्रीडाशिक्षक निखिल मराठे व अमोल शिरसाठ यांचे मार्गदर्शन लाभले.