आधारवड ग्रंथाचे प्रकाशन
लेखिका -लतिका चौधरी, दोंडाईचा
दादासाहेब रावल स्वोधारक सेवक पगारदार लोकांची सहकारी सोसायटीच्या वार्षिक सभेच्या कार्यक्रमात दि.24/8/2025 रविवार रोजी-
दोंडाईचा :- स्वोद्धारक विद्यार्थी संस्था, दोंडाईचा. निर्मिती, विकास याचा लेखाजोखा व श्रीमंत राजे रावल परिवाराचे सामाजिक, राजकीय, औद्योगिक, सांस्कृतिक, जनहित कार्यासाठी योगदान, 4 पिढ्यांची उज्ज्वल कारकीर्द असलेली प्रेरणादायी विजयगाथा यांची अक्षरनोंद असलेला पवित्र, पावन ग्रंथ- आयडीआधारवड चे नामदार मा.जयकुमारभाऊ रावल यांच्या शुभहस्ते प्रकाशन झाले.
प्रकाशनाचे वेळी व्यासपीठावर भाऊसाहेब मा. सी.एन. राजपूत(तज्ञ मार्गदर्शक, स्वो.वि. संस्था, दोंडाईचा) भाऊसाहेब मा. ललीतसिंहजी गिरासे (प्रशासकीय सचिव, तज्ञ मार्गदर्शक, स्वो.वि. संस्था, दोंडाईचा) भाऊसाहेब मा. एस.आर.पाटील व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सदरहू ग्रंथाचे लेखन, मांडणी लतिका चौधरी, उपशिक्षिका, स्वो.वि.सं.चे आर.डी.एम.पी.हायस्कूल, दोंडाईचा
यांनी केली असून पाठराखण मा. प्रा. वा.ना.आंधळे, धरणगाव यांनी केले आहे.