आषाढी एकादशी निमित्त विखरण येथे पालकमंत्री ना. जयकुमार रावल यांनी घेतले द्वारकाधीश विठ्ठल मंदिरात दर्शन
प्रतिनिधी – भूषण पवार
शिंदखेडा : – आषाढी एकादशीच्या पावन दिवशी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री व धुळे जिल्हा पालकमंत्री ना. जयकुमारभाऊ रावल यांनी प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विखरण येथील द्वारकाधीश विठ्ठल मंदिरात विठुमाऊलीचे दर्शन घेऊन राज्याच्या सुख, समृद्धी व शांततेसाठी प्रार्थना केली.यावेळी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीने भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.या प्रसंगी त्यांनी स्थानिक भाविकांशी संवाद साधत विठ्ठलभक्तीच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच प्रती पंढरपूर विखरण या ठिकाणाचा धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याबाबतही आश्वासक चर्चा केली.यावेळी कृ.उ.बा.समितीचे सभापती श्री.नारायण पाटील,भाजपा शिंदखेडा तालुकाध्यक्ष (दोंडाईचा ग्रा.) दिपक बागल जिल्हा सरचिटणीस डि.एस.गिरासे, दोंडाईचा न.पा.चे मा.नगरसेवक निखिल जाधव,के.पी.गिरासे,श्री विक्रम हिरामण तायडे (माजी उपसरपंच) , श्री भीमसिंग धनसिंग गिरासे(माजी उपसरपंच ), श्री विठ्ठल बुधा पाटील, श्री राजेंद्र पदमसिंग गिरासे, श्री महेंद्र राघो पवार सरपंच, श्री प्रविण गिरासे ,श्री रणजीत राजपूत,श्री प्रदीप विश्वास साळुंखे, हर्षल परमार, साहेबराव सोनवणे, अंतराम गंगाराम साळुंखे, श्री उमेश धर्मा पाटील श्री प्रविण पाटील,कामपूर विष्णु बाजीराव पाटील ( सरपंच ), श्री वकील रतन पाटील, श्री आनंदसिंग गिरासे, श्री चंद्रसिंग गिरासे, श्री राजेंद्र पाटील , सोनशेलु- श्री धीरज बडगुजर सरपंच, श्री जयसिंग गिरासे, श्री दिलीप गिरासे, बाम्हणे- अभय भुपेद्र निकम,कुणाल पाटील आदी उपस्थित होते