धुळे : तक्रारदार यांच्या वडिलांच्या नांवे मौजे सोंडले, ता.जि.धुळे येथील शेतजमीन असून सुलवाडे जामफळ प्रकल्पात हस्तातरित केल्याने तक्रारदार यांनी प्रकल्पग्रस्त दाखला मिळणेकरिता उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) धुळे यांचेकडे दि.28.02.2025 रोजी अर्ज केला होता. सदरचा अर्ज चौकशीकरिता तहसीलदार शिंदखेडा यांच्यामार्फतीने आलोसे छोटू पाटील,मंडळ अधिकारी भाग तामथरे ता. शिंदखेडा यांचेकडे देण्यात आला होता. तक्रारदार यांनी दि. 18.06.2025 रोजी आलोसे यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांचा अर्जाच्या चौकशीचा अहवाल तहसीलदार शिंदखेडा पाठविण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती 3,000/-रु. लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी तक्रार दिली होती. सदर तक्रारीची दि.19 जून रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता आरोपी यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती 3,000/-रु लाचेची मागणी केली असता दि. 20 जून रोजी तक्रारदार यांचेकडून 2,000/-रु लाचेची रक्कम स्विकारल्याने त्यांना पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले असून सोनगीर पो.स्टे.येथे भ.प्र.अधिनियम कलमाने गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
सदरची कारवाई सापळा व तपासी अधिकारी श्री.सचिन साळुंखे पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.विभाग. धुळे सापळा पथक पो.नि.रुपाली खांडवी, पो. हवा. राजन कदम, संतोष पावरा, मुकेश अहिरे, पो.कॉ. रामदास बारेला, चालक पो.हे.कॉ. सुधीर मोरे,
सर्व ला.प्र.वि.धुळे युनिट मार्गदर्शक-मा.शर्मिष्ठा घारगे वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक