*शिंदखेडा – साईलीला नगर जवळ एस टी बस व आयशर गाडीचा ओव्हरटेक करताना अपघात*
शिंदखेडा प्रतिनिधी – भूषण पवार
शिंदखेडा :- येथील साईलीला नगर जवळ एस टी बस क्रमांक एम एच 14 बी टी 2136 व आयशर गाडी क्रमांक एम एच 09 ई 1194 यांचा अपघात झाले असल्याचे घटना घडली आहे.सदर आयशर एसटी बसला ओव्हरटेक करत असताना आयशरच्या मागचा भाग एसटी बसच्या ड्रायव्हर साईडला धडकल्याने ड्रायव्हर साईड पूर्ण दाबली गेली आहे.सदर आयशर चालक एसटी बसला धडक देऊन दोंडाईचा कडे पळाला असल्याचे एसटी बसचे प्रवासी योगेश देवरे यांनी सांगितले.शिंदखेडा पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात सदर रस्त्यावर वाहनाने गश्त करीत होते सदर घटने बाबत माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले होते.पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी फोन द्वारे दोंडाईचा पोलीस स्टेशनला संपर्क साधून पोलीस निरीक्षक किशोर परदेशी यांना या घटनेविषयी सांगितले.तसेच आयशर चालक गाडी घेऊन दोंडाईचा कडे पळाला असल्याची माहिती दिली होती. पळून गेलेल्या चालकास त्याच्या आईसर वाहनासह बामणे या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेत शिंदखेडा पोलीस स्टेशनला आणले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.अपघात स्थळी साईलीला नगर येथील रहिवासी मदतीसाठी धावून आले होते.या एसटी बस मध्ये शालेय विद्यार्थी तसेच लग्न समारंभास जाणारे महिला प्रवाशांची गर्दी होती.श्रीराम कृपेने मोठा अनर्थ टळला असल्याचे सदर प्रवाशांचे म्हणणे आहे.बस चालक विकास भानुदास सोनवणे व वाहक मनोज कुमार बाविस्कर यांनी तत्काळ आगार प्रशासनास सूचना दिली असता अपघात स्थळी ए टी एस भामरे मॅडम स्टाफ सह उपस्थित होते. त्यानंतर प्रवाशांना पर्यायी बस उपलब्ध करून देण्यात आली होती.पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात करत आहेत.
मागून येणाऱ्या आयशर गाडी ने बसच्या ड्रायव्हर साईडला टोकर मारून दोंडाईचा कडे पळून गेला सुदैवाने मोठा अनर्थ टळला. सदर आयशर चालकास पोलिसांनी पकडले आहे त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.
प्रवासी योगेश देवरे शिंदखेडा
………………………………………………..
शिंदखेडा येथील साइलीला नगर जवळ गतिरोधक पास करत असताना भरधाव वेगाने एका आयशर गाडीने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी माझ्या बसला मी रोडच्या कडेला घेतले परंतु आईसर चा मागचा भाग बसच्या ड्रायव्हर साईडला धडकला त्याच्याने बसचे नुकसान झाले आहे आयशर चालक गाडीला धडक देऊन दोंडाईचा कडे पळाला आहे
विकास सोनवणे बस चालक
—————————————————————
आम्ही शिंदखेडा दोंडाईचा रस्त्यावर वाहनाने गश्त करत होतो सदर अपघाताची माहिती मिळाली असता तात्काळ अपघात स्थळी दाखल झालो होतो. सदर आयशर क्रमांक एम एच 09 ई 1194 या गाडी विषयी माहिती दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर परदेशी यांना दिली. बामणे या ठिकाणी गाडीला पकडण्यात आले सदर गाडी चालकासह शिंदखेडा पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली आहे गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात शिंदखेडा