*विभागस्तरीय उल्हास नवभारत साक्षरता मेळाव्यात जतीन बोरसे सरांच्या लोकगीताने वेधले सर्वांचे लक्ष..!!*
प्रतिनीधी – भूषण पवार
शिंदखेडा :- उल्हास नवभारत साक्षरता विभागस्तरीय मेळावा नाशिक येथे संपन्न झाला त्यात जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा येथील उपशिक्षक श्री. जे. डी. बोरसे यांचे लोकगीत शाळा शिकायची बाई ,, आता अडाणी राहायचं नाही.. या लोकगीताने नव साक्षरतेचा संदेश दिला सदर मेळाव्यात नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील सर्व माध्य. व प्राथ. शिक्षणाधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते तसेच श्री. जे. डी. बोरसे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले सदर मेळाव्यात पं. स. शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी श्री. सी. के. पाटील, विस्तार अधिकारी सौ. शैलजा रणजित शिंदे मॅडम, केंद्रप्रमुख श्री. आर. जी. राजपूत व गणेश हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. अशोक अमृतसागर धुळे जिल्ह्यातर्फ उपस्थित होते
या यशाबद्दल तसेच विभागस्तरीय उत्कृष्ट कामगिरी बद्दल संस्था अध्यक्ष मा. श्री.मनोहरजी गोरख पाटील, प्राचार्या श्रीमती एस. एस. बैसाणे, पर्यवेक्षक श्री. यु. ए. देसले, वरिष्ठ लिपिक श्री. किशोर पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी श्री. जे. डी. बोरसे यांचे कौतुक, अभिनंदन केले.