13.2 C
New York
Wednesday, November 20, 2024

Buy now

spot_img

शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात मतदान शांततेत – दिग्गजांचे भविष्य मतपेटीत बंद – संध्याकाळ पर्यंत 60.44 टक्के मतदान*

*शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात मतदान शांततेत – दिग्गजांचे भविष्य मतपेटीत बंद – संध्याकाळ पर्यंत 60.44 टक्के मतदान*

*प्रत्येक बुथवर महिला मतदारांत अधिक उत्साह दिसून आल्याची चर्चा रंगली*

शिंदखेडा प्रतिनिधी – भूषण पवार

शिंदखेडा : – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिंदखेडा मतदार संघात निवडणूक शांततेत पार पडली.तर शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत दिसून आली परंतु ती फक्त दुपारपर्यंतच असल्याच्या चर्चेला रंग चढला होता.या मतदारसंघात पुरुष मतदारां पेक्षा महिला मतदारांत अधिक उत्साह दिसून आला.शिंदखेडा विधानसभा मतदार संघात जवळपास ३३८ मतदान केंद्रांवर मतदान झाले आहे.तर एकूण तीन लाख ४२ हजार ८ एवढे मतदार आहेत.ज्यामध्ये पुरुष मतदार १ लाख ७३ हजार ४४६ तर महिला मतदार १ लाख ६७ हजार ५६२ एवढी आहेत.
शिंदखेडा मतदार संघात आज संध्यकाळपर्यंत एकूण 60.44 टक्के मतदान झाले असून त्यात पुरुष 59.46 तर महिला मतदान 61.47 टक्के इतके झाले आहे.यावरून महिला मतदारांत अधिक उत्साह दिसून आल्याची चर्चा रंगली आहे.एकीकडे बलाढ्य उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले असून दिनांक 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.सदर निवडणुकीत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.बंदोबस्तासाठी डीवायएसपी एक, पीआय,दोन, एपीआय सहा, पीएसआय १५ व ३०३ पोलिस, २५७ होमगार्ड, अधिकारी, कर्मचारी तैनात राहणार आहेत.तर आय टी बी पी फोर्सच्या तुकड्यादेखील तैनात होत्या.राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय सीमांतर्गत ६ स्थिर सर्वेक्षण पथके, ६ भरारी सर्वेक्षण पथके व १२ शीघ्रकृती पथके देखील कार्यरत करण्यात आले होते.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महादेव खेडकर यासंह तहसीलदार अनिल गवांदे यांनी तर शिंदखेडा शहरात पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी काम पहिले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!