वक्फ बोर्ड कायद्यात बदल करण्यासाठी मोदी सरकार तयार असून मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाहीत – केंद्रीय मंत्री अमित शहा
शिदखेडा : – वक्फ बोर्ड कायद्यात बदल करण्यासाठी मोदी सरकार तयार असून मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाहीत असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोंडाईचा येथे आयोजित जाहीर सभेत गरजले. सभेला संबोधित करताना ते म्हणाले की,धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद देशाच्या राज्यघटनेत नसल्याने मुस्लीम किंवा अल्पसंख्याकांना आरक्षण मिळू देणार नाही,महाविकास आघाडीला अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, आदिवासींचे आरक्षण कमी करून मुस्लीमांना आरक्षण द्यायचे आहे का?असा सवालही शहा यांनी यावेळी केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची चौथी पिढी जरी आली, तरीही ते जम्मू-काश्मीरला स्वायत्तता देणारे राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० परत लागू करू शकणार नाही,असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. मंचावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला ते म्हणाले की महाविकासआघाडीचे नेते सत्तेच्या लालसेने इतके आंधळे झाले आहेत की ते मागासवर्गीय, दलित आणि आदिवासींचे आरक्षण हिसकावून त्यांना देण्याचा कट रचत आहेत.महाआघाडीची ही योजना कधीही यशस्वी होऊ देऊ नका आणि सत्तेपासून दूर ठेवा,ज्याप्रमाणे हरियाणा राज्यात काँग्रेसचा सुफडा साफ झाला त्याप्रमाणे येत्या 23 तारखेला महाविकास आघाडीचा सुपडा साफ करावा असे आवाहन त्यांनी जनतेला केले.यावेळी आमदार जयकुमार भाऊ रावल,माजी मंत्री डॉ सुभाष भामरे,अमरीश भाई पटेल,किरण शिंदे,आमदार संगीता पाटील,संजय शर्मा, नारायण भाऊसाहेब यांनी मनोगत व्यक्त केले. प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विश्वनाथ पाटील उर्फ लालू दादा यांनी भाजपात असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. या सभेस शिंदखेडा मतदारसंघातून लाखोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.