*”रोटरी क्लब शिंदखेडा च्या वतीने कायरोप्रॅक्टीक शिबिराचे आयोजन”*
शिंदखेडा :- आपल्या शिंदखेडा शहर व परिसरात प्रथमच रोटरी क्लब ऑफ शिंदखेडा च्या वतीने कायरो प्रॅक्टिक उपचार पद्धती वर आधारित शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, खांदेदुखी यासारख्या त्रासांवर उपचार केले जातील त्याचप्रमाणे सायटिका, ऍसिडिटी, पोट साफ न होणे इत्यादीवर उपचार करण्यात येईल.
तरी ज्यांना वरील समस्या असतील त्या सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ शिंदखेडा च्या सर्व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात येत आहे.
शिबिर दिनांक : 23/09/2024 ते 29/09/2024 पर्यंत असेल.
वेळ: सकाळी १० ते १ वाजेपर्यंत आणि दुपारी ४ ते ७ वाजेपर्यंत.
स्थळ : किसान विद्यालय समोर, स्टेशन रोड, शिंदखेडा.
येताना सोबत आपले जुने रिपोर्ट्स, एक्स-रे आणावेत ही विनंती.