20.9 C
New York
Thursday, September 19, 2024

Buy now

मा.मंत्री आ.जयकुमार भाऊ रावल यांच्या प्रयत्नाने शिंदखेडा शहरात विविध विकासकामांसाठी चार कोटी रुपये निधी मंजूर*

  1. *माजी मंत्री आ.जयकुमार भाऊ रावल यांच्या प्रयत्नाने शिंदखेडा शहरात विविध विकासकामांसाठी चार कोटी रुपये मंजूर*

*प्रतिनीधी* –  भुषण पवार

शिंदखेडा :- शिंदखेडा शहराच्या विकासासाठी माजी मंत्री आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या प्रयत्नाने शिंदखेडा शहरासाठी चार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.त्यासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब अनिल वानखेडे व प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.रजनीताई वानखेडे यांचा पाठपुराव्याने आदरणीय् जयकुमार भाऊ रावल यांनी महाराष्ट्र शासनाकडून वैशिष्ट पूर्ण योजनेतुन नागरी ,स्थानिक ,स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसुचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी शिंदखेडा शहरा करिता 4 कोटी रुपये मंजूर् केलेत.आमदार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली रावसाहेब अनिल वानखेडे यांचा नेतृत्वात भारतीय जनता पार्टी अतिशय वेगाने शिंदखेडा शहरातील विकास कामे करत असून ,या 4 कोटी रुपयाने शिंदखेडा नगरपंचायत क्षेत्रातील वार्ड क्र. ८, ९, १०, ११, १२, १३ व १७ या ठिकाणी कॉक्रिट रस्ता तयार करणे अपेक्षित आहे.
शिंदखेडा नगरपंचायत गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे व प्रथम् लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.रजनीताई वानखेडे यांनी जयकुमार भाऊ रावल यांचे आभार व्यक्त केले.प्रसंगी शिंदखेडा नगरपंचायत चे गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे,माजी उपनगराध्यक्ष ,भिला पाटील, प्रकाश देसले,युवराज नाना माळी,चेतन परमार, अर्जुन भिल, मा.पं.स.सदस्य सुभाष माळी,माजी नगरसेवक तथा भाजपा शहराध्यक्ष विनोद पाटील,बाळासाहेब गिरासे, किसन सकट,प्रकाश नाना चौधरी,मा.नगरसेवक भाऊसाहेब मनोहर पाटील,सुरज देसले, जितेंद्र जाधव, उदय देसले,किसन सकट,आर. एच. दादा भामरे, जिल्हा चिटणीस प्रवीण माळी,सरचिटणीस भुपेंद्रसिंह राजपूत,संजयकुमार महाजन, प्रवासी संघटनेचे दादा मराठे शहर उपाध्यक्ष मिलिंद पाटोळे,भूषण पवार (फौजी), विकास सोसायटी संचालक रमेश नाना भामरे,दगा बापु चौधरी, बन्सी बोरसे, दिनेश सुर्यवंशी,सुयोग भदाने, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक उमेश गिरासे,तसेच शहरातील भाजपा समर्थकांनी आमदार जयकुमारभाऊ रावल यांचे आभार व्यक्त केले आहेत.मिळालेल्या निधीमुळे शिंदखेडा शहराच्या विकासात नक्कीच भर पडणार असून शहरातील जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!