*पाटण येथील आदिवासी शेतमजूर शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल – दूषित पाणी पिल्याचा प्राथमिक अंदाज*
शिंदखेडा प्रतिनिधी – भूषण पवार
शिंदखेडा : – तालुक्यातील चिरणे येथील एका शेतात शेतमजूर कामानिमित्त गेले असता त्यावेळी दूषित पाणी पिल्यामुळे 29 शेतमजूर आजारी पडले असून चक्कर व उलट्या झाल्याने त्यांना उपचारासाठी शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.सविस्तर असे की शिंदखेडा तालुक्यातील चिरणे येथील एका शेतात पाटण येथील शेतमजूर कापूस निंदणी करण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांनी एका ड्रम मधून पाणी पिल्याने त्यांना त्रास होत होता.त्यामुळे ते चिरणे येथील शेतातून एका ट्रॅक्टरने शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात पोहोचले.त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.त्यांच्यावर वैद्यकीय अधीक्षक डॉ.भूषण काटे व डॉ.विनय पवार हे आपल्या सर्व परिचारिका व टीम सोबत उपचार करत होते.डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की पावसाळ्यात जवळपास आजार दूषित पाणी पिल्याने होतात.रुग्णांना मळमळने, चक्करयेणे ,उलट्या होणे,पोटात दुखणे,डोके दुखणे असा त्रास जाणवत असल्याने त्यांना सलाईन बॉटल लावण्यात आल्या होत्या.शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत 29 रुग्ण दाखल करून घेण्यात आले होते. त्यात 01 पुरुष, 12 महिला,16 लहान मुले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.तसेच सर्वांची प्रकृती आता स्थिर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
घटनास्थळी शेतकरी संवाद यात्रा अर्धवट सोडून खलाने गटाचे मा.जि.प.सदस्य,पंकज कदम,दिपक मोरे प.स.उपसभापती शिंदखेडा, राकेश पाकळे उपजिल्हा रुग्णालयात विषबाधा झालेल्या नागरिकांची विचारपूस करून पाहणी केली व वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली.
दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता अचानक 25 ते 30 रुग्ण ग्रामीण रुग्णालयात दाखल होण्यासाठी आले. हे सर्व शेतमजूर होते. ते चिरणे कदाने या भागात एका शेतात शेतमजुरीसाठी गेले होते त्या ठिकाणी त्यांनी दूषित पाणी पिल्या असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्यावर प्राथमिक उपचार चालू आहे.कोणताही रुग्ण गंभीर परिस्थितीत नाही आणि कोणत्याही रुग्णास धुळे किंवा शिरपूर रुग्णालयासाठी रेफर केलेले नाही. सर्वांची प्रकृती आता स्थिर आहे.
डॉ. विनय पवार,वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय शिंदखेडा