spot_img
spot_img

गावांतर्गत वादाला कामराज निकमांनी राजकीय रंग देवू नये: वायपुर उपसरपंच दत्तात्रय पाटील

 

*उलट कामराज निकमने माझ्यावर पोक्सो दाखल करण्याची धमकी दिली*

*माझ्या घरावर हल्ला झाला तसा तुमच्या घरावर झाल्यावर तुम्ही शांत बसणार का.?*

दोंडाईचा :- माझ्या गावातील पूर्वाश्रमीचे विरोधक असलेले 15 ते 20 लोक येऊन माझ्या पोलीस पाटील असलेल्या पत्नीला आणि 65 वर्षाच्या म्हताऱ्या आईला मारहाण, दमदाटी, आणि घरातील मौल्यवान वस्तु चोरून नेल्या खरं तर या गटाचे आणि माझ्या परिवाराचे पूर्व वैमनस्य गेल्या 25 वर्षांपासून आहे, माझ्या परिवाराने ग्रा प वर अबाधित सत्ता राखल्याचे यांना गेल्या 20 वर्षापासून खटकत आहे, तसे गुन्हे देखील यापूर्वी दाखल आहेत, यांच्या नेहमीच्या दादागिरीला मी आणि माझा परिवार वैतागला असून यात आ जयकुमार रावल यांचा कुठेही सुतनाम संबंध नाही, पण अंगात आमदारकीचे वारं भरलेल्या कामराज निकम या गोष्टींला सारं गाव साक्षीला असतांना ही राजकिय स्वरूप देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे आलेल्या जमावाने घरात घुसून माझ्या आई बहिणीला अर्वाच्य शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर चे दागिने लुटणाऱ्या विकृत लोकांविरुद्ध मी न्याय व संरक्षण मागण्यासाठी दाखल केलेल्या गुन्ह्याला कामराज निकम हा गुन्हा खोटा आहे किंवा राजकीय दडपण आणून दाखल केला आहे असे निवेदन देऊन आपली खालावलेली नैतिक पातळी सिद्ध करतो आहे,
*माझ्या घरी 15 ते 20 लोक मारामारी साठी आलेच नाहीत हे कामराज निकम ने सिद्ध करून दाखवावे*
कुणाच्या आया बहिणींची असे टवाळ लोक जर अब्रू काढत असतील आणि त्यासाठी दाखल केलेल्या गुन्हला कामराज निकम जर खोटा गुन्हा म्हणत असेल तर त्याने भर चौकात सामोरा समोर यावे आणि सिद्ध करून दाखवावे की, असे घडलेच नाही, हे त्याने सिद्ध करून दाखवावे कारण माझ्या संपर्क गावाने हा प्रकार पाहिलेला आहे

*उलट कामराज निकमने मलाच पोक्सो दाखल करण्याची धमकी दिली*
माझ्या वर झालेल्या प्रकार बाबत मी पोलिसात गुन्हा दाखल करायला गेलो त्यानंतर कामराज निकमने माझ्या वर पोक्सो गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली असून याबाबत मी स्वतंत्र पणे पोलीस अधीक्षक यांना हे निवेदन देणार आहे, त्यांनी केलेल्या कॉल ची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील दत्तू पाटील यांनी केली आहे

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!