20.9 C
New York
Thursday, September 19, 2024

Buy now

दिल्ली येथे खा.अमोलजी कोल्हे यांच्या हस्ते श्री.उमाकांत पाटील यांचा सत्कार,,,

*दिल्ली येथे खासदार श्री अमोलजी कोल्हे यांच्या हस्ते श्री उमाकांत पाटील यांचा शाल टाकून व बुके देऊन सत्कार.*

शहादा :-  शेल्टी तालुका शहादा जि. नंदुरबार येथील रहिवाशी श्री.उमाकांत शिवाजी पाटील ( सामाजिक कार्यकर्ते )यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे शिरूर येथील लोकसभेचे खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे लोकसभा व विधानसभा स्टार प्रचारक श्री अमोलजी कोल्हे यांनी दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार श्री.शरदचंद्र पवार साहेब यांच्या 6 जनपथ निवासस्थानी केला. श्री उमाकांत शिवाजी पाटील हे नेहमी गोरगरीब आदिवासी,दलित,कोळी, कुणबी, मुस्लिम,राजपूत, मातंग, माळी, मराठा, असे अनेक समाजातील लोकांना दवाखाना असो कीव्हा ईतर समस्या जाणून घेऊन त्यांच्या जवळ उपचार वेळी स्वतःथांबने व इतर कामासाठी मदत करत असतात.आता पर्यंत त्यांनी तीस पेक्षा जास्त लोकांचे जीव वाचवण्याचे काम केलं आहे. कोरोना काळात स्वतः पॉजिटीव्ह असतांना स्वतःला झालेल्या त्रासाची जाणीव असतांना देखील कोरोना झालेल्या लोकांची मदत केली होती.आता पर्यंत त्यांनी मदत करत असतांना कोणताही जातीभेद व धर्मभेद केला नाही. ही देखील कौतुकाची बाब आहे.श्री. उमाकांत शिवाजी पाटील.यांच्या सामाजिक व राजकीय कार्यासाठी खासदार श्री. अमोलजी कोल्हे यांनी शुभेच्छा देखील दिल्या.*

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!