16.6 C
New York
Thursday, October 10, 2024

Buy now

शिंदखेडा शहरात रोहींग्या मुसलमान राहत असल्याचा संशय,संशयीतांची ओळख करून कायदेशीर कारवाई करा – निवेदनातून मागणी


उपसंपादक – भूषण पवार

शिंदखेडा : – शिंदखेडा येथे योगी दत्ता नाथजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनास निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की,रज्जाक नगर या ठिकाणी काही समाजकंटकांद्वारे सर्रास गोवंश हत्या व अवैध कत्तलखाने चालविण्यात येत आहेत. त्या ठिकाणी दिनांक 19 जुन 2024 रोजी सकाळी अंदाजे 07 वाजता विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरक्षा विभागाद्वारे अवैध कत्तलखान्यात गो हत्या करताना विशिष्ट धर्माच्या समाजकंटकांना पकडण्यात आले त्याविषयी सदर माहिती लगेच पोलीस स्टेशन शिंदखेडा यांना कळविण्यात आली होती.या संबंधित अटक करण्यात आलेल्या आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी, पुढें म्हटले आहे की त्या परिसरात रोहिंग्या मुसलमान असल्याचा संशय आहे व त्यांना शिंदखेडा शहरातून काही ठिकाणी खोटे आधार कार्ड नोंदणी करणे व मुंबई येथून खोटे शिक्के मारून आधार कार्ड बनविण्याचा व्यवसाय सुरू आहे. तरी आपण सदर माहितीची खातरजमा करावी तसेच रोहिंग्या मुसलमानांची ओळख करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व रज्जाक नगर येथील अवैध गोवंश कत्तलखाने जमीनदोस्त करून गोहत्या कायमस्वरूपी बंद करण्यात यावी.या आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले.सदर निवेदन मा उपमुख्य मंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना देण्यात आले आहे.सदर निवेदन नायब तहसिलदार श्रीमती शारदा बागल यांनी स्वीकारले.
हयावेळी सकल हिंदू समाजाने संध्याकाळी भगव्या चौकापासून शेकडोंच्या संख्येने शिंदखेडा तहसील कार्यालयात धडक दिली.आपल्या भावना शासनास त्वरित पाठवले जाईल.असे नायब तहसिलदार श्रीमती शारदा बागल यांनी सांगितले.प्रसंगी शिंदखेडा पोलीस निरीक्षक दिपक पाटील ,पोलीस उपनिरीक्षक विजय ठाकूर ,पो.का.चेतन माळी यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

.
येत्या 7 दिवसाच्या आत सदर निवेदनावर कडक अंमलबजावणी व्हावी अन्यथा सकल हिंदू समाजाच्या वतीने जन आक्रोश आंदोलन करण्यात येईल त्यावेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्व प्रशासन जबाबदार राहील.
योगि दत्तानाथजी महाराज
शिंदखेडा शहरात रोहिंग्या मुसलमान असल्याचा संशय आहे व त्यांना शिंदखेडा शहरातून काही ठिकाणी खोटे आधार कार्ड नोंदणी करणे व मुंबई येथून खोटे शिक्के मारून आधार कार्ड बनविण्याचा व्यवसाय सुरू आहे.खोटे आधार कार्ड बनविण्यासाठी 10 हजार रुपये घेतले जात असल्याची चर्चा सुरू आहे.तरी प्रशासनाने हा प्रकार उघडकीस आणावा व दोशींवर कडक कारवाई करावी.
प्रवीण माळी, भाजपा धुळे जिल्हा चिटणीस

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!