16.6 C
New York
Thursday, October 10, 2024

Buy now

बाम्हणे गावातील नवविवाहित दाम्पत्याचा एक अनोखा उपक्रम,,

  • बाम्हणे :- नवविवाहित  जोडप्याचा  एक अनोखा उपक्रम पर्यावरण पूरक संदेश जावा म्हणून लग्नात आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना लग्ना निमित्त सीडबॉल भेट म्हणून दिले. बाम्हने ता.शिंदखेडा येथील इंजि.सुयोग यशवंतराव बोरसे हे नेहमी वृक्ष लागवड तसेच विविध सामाजिक  प्रकारच्या उपक्रमात सहभागी होताना दिसून येत असतात,त्यांनी आपल्या  स्वतःच्या लग्नात  बाम्हने येथे आलेल्या पाहुणे मंडळींना व नातेवाईकांना सप्रेम भेट म्हणून विविध भारतीय प्रजातीच्या वृक्ष बियां एकत्र गोळा करून त्या पासून तयार केलेले सीड बॉल व कापडी पिशवी वाटप केले.त्यांच्या या उपक्रमाचे विविध स्थरातून स्वागत होत आहे. पर्यावरण पूरक समतोल राखण्यासाठी त्यांनी हा छोटासा प्रयत्न आपल्या माध्यमातुन केला आहे.त्यांना या कामी दीपक देसले सर व खादी ग्रामोद्योग मंडळ यांची अनमोल साथ व  सहकार्य लाभले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!