✍️✍️🚥🚥✍️✍️
संपादकीय,,,,,,,
चिमठाणा ;- चिमठाणा ते शिंदखेडा दरम्यान बुराई नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिज(वाळू) वाहतूक होताना दिसून येत आहे.
बुराई नदीचे सर्वात मोठे पात्र हे अलाने ते परसामळ दरम्यान असून याच ठिकाणी जास्त प्रमाणावर गौण ( वाळू) खनिजाचा साठा उपलब्ध असल्यामुळे याच ठिकाणाहून वाळूची सर्रासपणे वाहतूक केली जाते.
या सर्व गोष्टींकडे महसूल विभाग व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे सध्या बुराई काठावरील गावांना पाणीटंचाई भेडसावत असताना, वाडी – शेवाडी धरणातून पाण्याची तहान भागवण्यासाठी शिंदखेडा तालुक्याचे पाणीदार आ.मा.मंत्री.जयकुमार रावल यांच्या प्रयत्नांमुळे पाणी सोडण्यात आले आहे.
तरी बुराई नदी पात्रातून सर्रास वाळू वाहतूक होताना दिसुन येत आहे,महसूल विभागाने या सर्व गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देऊन गौण खनिज वाहतूक करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी.बुराई
काठावरील सर्व गावातील नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महसूल विभाग कुठलेही पाऊल उचलताना दिसून येत नाही आहे,
महसूल विभागाने काही प्रमाणात भरारी पथकाची नेमणूक केली असली तरी या भरारी पथकाच्या वेळेनुसार बदल करणे अपेक्षित आहे तरच या गोष्टीवर काही प्रमाणात वचक बसेल असे दिसून येत आहे सध्या शिंदखेडा तालुका दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून बुराई काठावरील गावांना तीन ते चार दिवसा आड पाणीपुरवठा होत असून त्या अनुषंगाने गौण खनिज वाहतूक करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडत आहे.
यापुढेही गौण खनिज वाहतूक चालू राहिली तर बुराई काठावरील गावांना येणाऱ्या काळात मोठ्या संकटांचा सामना करावा लागणार आहे.