spot_img
spot_img

चिमठाणे बसस्थानकातील सुविधांचा अभाव; परिवहन मंत्र्यांकडे लेखी तक्रार

चिमठाणे बसस्थानकातील सुविधांचा अभाव; परिवहन मंत्र्यांकडे लेखी तक्रार

शिंदखेडा : – शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील बसस्थानकावर मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव असल्याची तक्रार नागरिकांच्या वतीने परिवहन मंत्र्यांकडे करण्यात आली आहे. याबाबत माजी सैनिक व सामाजिक कार्यकर्ते श्री.महेंद्र गोपाळ पाटील (सोनू फौजी) यांनी लेखी निवेदन सादर करून तातडीने सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, चिमठाणे हे वाढत्या लोकसंख्येचे गाव असून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक तालुका,जिल्हा तसेच शहरांकडे प्रवास करतात.मात्र येथे सुस्थितीत बसस्थानक नसल्याने प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही, सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, दूरध्वनी सुविधा उपलब्ध नाही, बसण्याची व्यवस्था अपुरी आहे तसेच प्रसाधनगृहाची सुविधाही नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.याशिवाय वाहतूक नियंत्रक कर्मचारी सकाळी ते रात्री पूर्णवेळ उपलब्ध नसल्याची बाबही मांडण्यात आली आहे.

तसेच चिमठाणे बसस्थानकातून शिरपूर, शहादा, धुळे, नंदुरबार आदी मार्गांवर शटल व नियमित बससेवा वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक बसची बसस्थानकात नोंद व्हावी आणि प्रवाशांना नियमित सेवा मिळावी,अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी धुळे,विभागीय नियंत्रक (रा.प. महामंडळ) धुळे विभाग आणि आगारप्रमुख, शिंदखेडा आगार यांनाही देण्यात आल्या आहेत.आता परिवहन विभाग यावर काय कार्यवाही करतो, याकडे चिमठाणे व परिसरातील प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!