सन्मान कर्तृत्वाचा
दोंडाईचा : – कर्तव्यदक्षता, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेचा वारसा जपणाऱ्या सुपुत्रांचा गौरव करणे ही आपली समृद्ध परंपरा आहे. याच भावनेतून दराणे–रोहाणे ग्रामस्थांच्या वतीने धरणगाव नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ. अंजनाताई भानुदास वीसावे तसेच भारतीय सैन्य दलातून सन्मानपूर्वक सेवानिवृत्त होऊन पोलीस दलात रुजू झालेले शिवदास महारू वसइत यांचा भव्य नागरी सत्कार व मिरवणूक सोहळा उत्साहात पार पडला.
सौ.अंजनाताई वसावे या धरणगाव नगरपालिकेत सलग तिसऱ्यांदा नगरसेवकपदी निवडून आल्या आहेत. तर शिवदास महारू वसइत हे भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर कल्याण कारागृहात पोलीस पदावर नियुक्त झाले आहेत. हे दोन्ही सत्कारमूर्ती कै.महारू नथा वसइत व सुमनबाई वसइत यांची अपत्ये असून मंगा महारू वसइत यांचे लहान बंधू-भगिनी आहेत.
या प्रसंगी सत्कारार्थींची गावातून उघड्या जीपमधून वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोहाणे गावचे सरपंच मेघशाम वाघ होते. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास वसावे उपस्थित होते.
जे. पी. गिरासे (माजी उपसरपंच, रोहाणे) यांनी आपल्या मनोगतात सत्कारार्थींच्या जिद्द,संघर्ष व समाजकार्याचे कौतुक केले. भानुदास वसइत यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, धरणगाव नगरपालिकेची निवडणूक लढविताना राज्याचे मंत्री मा.गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शन नेहमीच मोलाचे ठरले असून, त्यांनी दाखवलेल्या विकासाच्या मार्गावर आम्ही वाटचाल करीत आहोत. रोहाणे गावाने केलेला हा सन्मान आमच्यासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी माजी प्राचार्य आय.एस.गिरासे,निंबा विश्राम वाघ, जयपाल गिरासे यांनीही आपले विचार मांडले. या सोहळ्यास निंबा पाटील, आनंदा यराम पाटील, तखतसिंग गिरासे, आनंदा रामदास पाटील, भूषण वाघ, राजू अण्णा, सुभाष गिरासे, जयसिंग गिरासे, उपसरपंच विजयसिंग गिरासे, निलेश वाघ, कैलास भील,बापू पवार,विश्वास वाघ,भटू भिवसन वाघ, रामजी बच्छाव, किसन शिंदे, निंबा भामरे, डॉ.माळी,भास्कर आनंदा वाघ यांच्यासह दराणे–रोहाणे येथील पोलीस पाटील, आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला मंडळाच्या पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन योगेश वाघ यांनी केले, तर कार्यक्रमाचे संयोजन मंगा वसावे यांनी केले







