वाडी-शेवाडे मध्यम प्रकल्प पुर्ण क्षमते भरल्याने मा.जि.सदस्य विरेंद्रसिंगगिरासे यांच्या हस्ते डाव्या-उजव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले.
वडणे. :-शिंदखेडा तालुक्यातील वाडी-शेवाडे मध्यम प्रकल्प येथे आज दिनांक ४ऑक्टोबर २०२५रोजी मा .ना. श्री .जयकुमार भाऊ रावल मंत्री, पणन व राजशिष्टाचार महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई तथा पालकमंत्री धुळे यांच्या सूचनेनुसार वाडी शेवाडे मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरल्याने अतिरीक्त पाणी बुराई नदीमध्ये सोडण्यापेक्षा,हे पाणी डावा उजवा कालव्यात सोडावे. यानुसार चिमठाणे गटाचे मा.जिल्हा परिषद सदस्य विरेंद्र आबा गिरासे यांच्या हस्ते व मा सभापती रणजीतसिंग गिरासे, धुळे मध्यम प्रकल्प क्रमांक १चे कार्यकारी अभियंता आय.एस. पढार, उपअभियंता विशाल घोडे यांच्या उपस्थितीत हे पाणी डाव्या -उजव्या कालव्यात सोडण्यात आले.
सदर डाव्या उजव्या कालव्यात पाणी सोडल्याने मा. ना. श्री. जयकुमार भाऊ रावल यांनी जलयुक्त शिवार योजना, जलसंधारण विभागामार्फत बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधारे व माती बंधारे भरण्यात येतील त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या विहिरींना ,ट्यूबवेल यांना पाण्याचा मुबलक प्रमाणात स्रोत निर्माण होईल, या दृष्टिकोनातून मा. ना .श्री .जयकुमार भाऊ रावल यांनी वरील ठिकाणी पाणी सोडण्याच्या सूचना केल्या होत्या. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दगेसिंग गिरासे, शेवाडे येथील राजाराम मोरे, राजेंद्र वाणी, युवराज धनगर, भोमराज वाणी, राजेंद्र गिरासे, रमेश वाणी, तुषार माळी, रतिलाल कोळी, अर्जुन कोळी, भैया माळी, गोटू गिरासे, छोटू फौजी पाटील, इमाम पिंजारी, जिवराज कोरडकर, अण्णा मोरे, दिलीप माळी, योगेश पाटील, ऋषी गिरासे, आशिष गिरासे, वाडी सरपंच स्वर्णसिंग गिरासे, आरावे येथील कैलास गिरासे, रवींद्र गिरासे, भटेसिंग गिरासे, पिंटू गिरासे, भरत गिरासे, समाधान धनगर,दिपक गिरासे, नामदेव ठेलारी, गोरख ठेलारी, तिरलोकसिंग गिरासे, वासुदेव भील जखाने येथील सरपंच बंटी बागुल, चतुर बेहेरे, कोमलसिंग गिरासे, भगवान बेहेरे, राहुल गिरासे, संदीप पाटील, ज्ञानेश्वर गिरासे, शुभम बेहरे आदी शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता भूषण राणे, प्रणव राऊत, जयेश सगळे,प्रविण पाटील हे उपस्थित होते. सदर डावा उजवा कालव्यात पाणी सोडल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून मा. ना .श्री. जयकुमार भाऊ रावल यांचे आभार व्यक्त केले. तसेच वाडी शेवाडे धरणात मोठ्या प्रमाणात आवक असल्याने बुराई नदी मध्येही काही क्युसेस पाणी सोडण्यात आले.तर मा.जि.प.सदस्य विरेंद्रसिंग आबा गिरासे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की,आज पर्येंत ,स्वप्न स्वन्पातील चिञला स्पर्श करत,बळीराजासाठी व शेतीसाठी अधिक उत्तम ठरणार आहे.चिमठाणे गट तसेच तालुका बाराही महिने पाणी पाणी उपलब्ध व्हावे म्हणुन ना.जयकुमार भाऊ यांचे नेहमी कायम प्रयन्त सुरु आहेत.