उत्सव दिनांक व वेळ – शुक्रवार दि.०३ ऑक्टोबर २०२५ रोजी सांयकाळी ६:३० वाजता
पथसंचलन ठीक 4.30 वाजता,दोंडाईचा
दोंडाईचा. :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला या वर्षी शंभर वर्ष पूर्ण होत आहे. या शताब्दी वर्षानिमित्त संघ स्वयंसेवक वर्षभर विविध कार्यक्रम करणार आहेत. विजयादशमी उत्सव हा सहा उत्सवांपैकी एक उत्सव आहे. दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी दोंडाईचा शहराचा निर्मल एम्पोरियम चौक, स्टेशन भाग, दोंडाईचा या ठिकाणी विजयादशमी उत्सव संपन्न होत आहे. या उत्सावासाठी प्रमुख पाहुणे ह.भ.प.श्री. अशोक महाराज टिल्लु ( विश्वस्त श्री व्दारकाधीश संस्थान विखरण देवाचे) आणि प्रमुख वक्ते श्री. स्वप्नीलजी चामणिकर (प्रांत प्रचारक देवगिरी प्रांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) असणार आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शतक महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त ३ ऑक्टोबर रोजी दोडाईचा येथे पथसंचलन करण्यात येणार आहे. गोपालपुरा ते निर्मल एम्पुरियम चौक स्टेशन भाग दोंडाईचा येथे पथसंचलन करण्यात येणार आहे.
सायंकाळी ६.३० वा. श्री द्वारकाधीश संस्थान विखरण देवाचे येथील विश्वस्त हभप अशोक महाराज टिल्लू हे प्रमुख अतिथी तसेच प्रमुख वक्ते देवगिरी प्रांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रांत प्रचारक, स्वप्निल चामनिकर यांच्या उपस्थितीत निर्मल एम्पोरियम चौक दोंडाईचा येथे विजय दशमी उत्सव साजरा होईल, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
उत्सव स्थान निर्मल एम्पोरियम चौक, स्टेशन भाग, दोंडाईचा, पथसंचलन ठीक 4.30 वाजता,दोंडाईचा
उत्सव दिनांक व वेळ – शुक्रवार दि.०३ ऑक्टोबर २०२५ रोजी सांयकाळी ६:३० वाजता