साक्री – ( निलेश तोरवणे )
” सेवा पंधरवडा “अंतर्गत अतिक्रमित पाणंद रस्ता मोकळा; ग्रामस्थ व प्रशासन एकत्रित.
साक्री :- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत राष्ट्रनेता, पंतप्रधान मा. श्री.नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस (17, सप्टेंबर, 2025) ते महत्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोंबर 2025) दरम्यान “सेवा पंधरवडा” अंतर्गत बेहेड व दारखेल येथील सीमालगत कोकले, कासारेकडे जाणारा अतिक्रमित रस्ता ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागाने पाणंद रस्ता मोकळा करण्यात आला. ही मोहिम मा. तहसिलदार सो. साक्री यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली.
ग्रामस्थांसह गावीत नाना – मंडळ अधिकारी , प्रगती नांद्रे, अपूर्वा बोरसे, डी. बी. चव्हाण ग्राम-महसूल अधिकारी, सुनील बोरसे, महसूल सेवक, पोलिस पाटील आणि बेहेड व दारखेल दोन्ही गावांच्या ग्रामस्थांनी या उपक्रमात सक्रिय घेतल्याने रस्त्याचे अतिक्रमण दूर करण्यात यश मिळाले. त्यामुळे या भागातील रहिवाशांसाठी वाहनचालन, पायी चालणे तसेच आपत्कालीन सेवा यांचा मार्ग मोकळा झाला. ग्रामस्थांनी प्रशासनाशी सहकार्य करून रस्त्याच्या दोन्ही बाजू स्वच्छ ठेवण्याचे वचन दिले. मा. श्री. साहेबराव सोनवणे तहसिलदार सोl. साक्री यांनी सांगितले की, लोकसहभागातून स्थानिक प्रश्न सोडविण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. रस्ता मोकळा करणे, हा फक्त भौतिक सुविधा पुरवण्याचा उपक्रम नाही, तर ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यातील समन्वयाचे उत्कृष्ठ उदाहरण आहे.