spot_img
spot_img

*स्वातंत्र्यदिनी शिंदखेड्यात रेल्वे संघर्ष समितीचे रेल रोको आंदोलन – पुणे गाडी सुरू करण्याची मागणी*

स्वातंत्र्यदिनी शिंदखेड्यात रेल्वे संघर्ष समितीचे रेल रोको आंदोलन – पुणे गाडी सुरू करण्याची मागणी*l

*माजी संरक्षण मंत्री सुभाष भामरे यांची आंदोलकांना भेट*

शिंदखेडा  : – येथील रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा तसेच पुणे गाडी सुरू करण्यात यावी यासंदर्भात रेल्वे संघर्ष समिती विविध मागण्यांसाठी बऱ्याच काळापासून संघर्ष करीत आहे.परंतु अद्याप पावतो कुठलीही प्रतिक्रिया प्रशासनाद्वारे मिळाली नसल्याने आज दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी शिंदखेडा रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलकांनी शिंदखेडा स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा तसेच पुणे गाडी सुरू करण्यात यावी या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी रेल्वे रुळावर बसून घोषणा दिल्या.पुणे गाडी सुरू झालीच पाहिजे,एकापेस गाड्यांना शिंदखेडा स्थानकावर थांबा मिळालाच पाहिजे अश्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. रेल्वे पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांना रेल्वे रुळावरून उठवण्याचा प्रयत्न केला व समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु आंदोलकांनी नवजीवन एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर मध्यभागीच रेल्वे थांबवून तब्बल 15 ते 20 मिनिट पर्यंत रेल्वे थांबवून ठेवण्यात आली होती.या आंदोलनाची पूर्वसूचना रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने प्रशासनाला देण्यात आली होती.प्रसंगी रेल्वे पोलीस फोर्स चे असिस्टंट कमांडंट आर आर जेम्स यांच्या नेतृत्वात रेल्वे पोलीस फोर्सच्या जवानांचा ताफा कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपस्थित होता.यावेळी आर पी एफ चे इन्स्पेक्टर बसंत राय यांच्या सह 2 सब इन्स्पेक्टर व अन्य मिळून 20 जवान उपस्थित होते.यावेळी आंदोलन स्थळावर उपस्थित रेल्वे अधिकारी आंदोलनादरम्यान रेल्वे वाहतुकीवर होणारा परिणाम कमी करण्याच्या दृष्टिकोनाने त्यांच्या वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते.रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आंदोलकांच्या मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लवकरच पोहोचविण्यात येणार असल्याचे समजले.
प्रसंगी माजी संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे यांनी आंदोलकांना आंदोलन सुरू होण्यापूर्वी भेट दिली.यावेळी रेल्वे संघर्ष समितीचे गोविंद प्रकाश मराठे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.प्रसंगी गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे, माजी उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख, प्रकाश पाटील,भिला पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी,भाजपा शहराध्यक्ष संजय कुमार महाजन,संजय पाटोळे ,खानदेश रक्षक ग्रुपचे सदस्य तसेच चंद्रकांत गोधवानी, राकेश महिरे,राजेंद्र मराठे,गजानन भामरे, सुनील परदेशी, माजी नगरसेवक उदय देसले ,बाळासाहेब गिरासे, याकूब पठाण तसेच मोठ्या संख्येने रेल्वे संघर्ष समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

आंदोलकांच्या मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लवकरच पोहोचविण्यात येणार
एल बी सिंह रेल्वे अधिकारी
——————————————-
येत्या दोन दिवसांत रेल्वे मंत्री यांना भेटून आपली मागणी त्यांच्या समोर मांडणार व येत्या काळात पुणे गाडी सुरू व्हावी या साठी प्रयत्न करणार
माजी खासदार सुभाष भामरे
————————————————
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपयुक्त पोलीस बळ घेऊन आम्ही सकाळ पासून तैनात आहोत,आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता.आंदोलकांनी 15 ते 20 मिनिट गाडी थांबवून ठेवली या विषयी माहिती वरिष्ठांना कळविण्यात आली.
आर आर जेम्स, असिस्टंट कमांडंट आरपीएफ
————————————————
नवीन पुणे गाडी सुरू करून त्या सोबत शिंदखेडा येथे प्रेरणा ,भागलपूर,पुरी एक्सप्रेस ला थांबा मिळावा
दादा मराठे

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!