देशाच्या 79 व्या स्वातंत्र निमित्त शिंदखेडा येथील गांधी चौकातील ध्वजारोहण ठरला आकर्षण बिंदू – मागील पाच वर्षाची परंपरा कायम
*रावसाहेब अनिल वानखेडे यांचे शहरातील सर्व आजी-माजी सैनिक व त्यांच्या परिवारातर्फे कौतुक*
शिंदखेडा प्रतिनिधी भुषण पवार
शिंदखेडा :- येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, नगरपंचायत, तहसील कार्यालय,विकास सोसायटी,पोलीस स्टेशन,अशा ठिकाणी प्रशासनाद्वारे ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला.विशेष म्हणजे ह्यावर्षी देखील शहरातील गांधी चौकातील ध्वजारोहण आकर्षणाचा बिंदू ठरला मागील पाच वर्षापासून नगरपंचायत प्रशासनाद्वारे गांधी चौकातील ध्वजारोहण सैनिकांच्या सन्मानार्थ माजी सैनिकांद्वारे करण्यात येत आहे.ही परंपरा रावसाहेब अनिल वानखेडे (गटनेते नगर पंचायत शिंदखेडा)यांनी पाच वर्षापूर्वी सुरू केली आहे.त्याचप्रमाणे यावर्षी देखील त्यांनी गांधी चौकातील ध्वजारोहणाचा मान माजी सैनिक मच्छिंद्र भाईदास पाटील यांना दिला असता शहरातील सर्व आजी-माजी सैनिक व त्यांच्या परिवारातर्फे रावसाहेब अनिल वानखेडे यांचे कौतुक केले जात आहे.पूर्वी या ठिकाणी जेष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, किंवा पुढार्यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असे परंतु मागील पाच वर्षापासून रावसाहेब अनिल वानखेडे यांनी गांधी चौक या ठिकाणी माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची परंपरा सुरू केली या निर्णयाचे सर्व स्तरावरून कौतुक होत असून रावसाहेब अनिल वानखेडे यांचे सैनिकांवर असलेले प्रेम यातून स्पष्ट होते.रावसाहेबांच्या मनात असलेले देश प्रेम त्यांच्या कार्यशैलीतून दिसून येते.खानदेश रक्षक ग्रुप आजी-माजी सैनिक संघटना तर्फे गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे, नगराध्यक्षा रजनीताई वानखेडे ,नगरपंचायत प्रशासन यांचा आभार व्यक्त करण्यात आले.
ध्वजारोहण हे कोणीही करू शकते परंतु योग्य वेळी योग्य जागेवर योग्य व्यक्ती द्वारा ध्वजारोहण करून घेणे सामाजिक स्तरावर महत्त्वाचे असून व्यक्ती कौशल्यावर अवलंबून असते यामुळे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत चांगला संदेश जातो.
माजी सैनिक भूषण पवार