शिंदखेडा:- दिनांक.12 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्र शेतकरी संघटना शिंदखेडा तालुका अध्यक्ष श्री विठ्ठलसिंग मके सिंग गिरासे व संघटनेचे इतर पदाधिकारी तसेच शेतकरी यांनी निवेदनाद्वारे माननीय तहसीलदार साहेब. तहसील कार्यालय शिंदखेडा यांच्यातर्फे शिंदखेडा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा व सध्याच्या सरकारने तसेच राजकीय पक्षांनी सरसकट कर्जमाफीची आश्वासने दिले होते त्याप्रमाणे शिंदखेडा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी करावी. आशा मागण्या शासनाकडे केल्या आहेत.सिंदखेडा तालुक्यात अत्यंत अल्प प्रमाणात पाऊस झाला असून शेतकऱ्यांचे यावर्षी खरीप हंगाम उध्वस्त झाले असून शेतकर पूर्णपणे उध्वस्त झालाआहे. कापूस सोयाबीन ऊस उडीद मूग भुईमूग बाजरी ज्वारी कांदा भाजीपाला असे अनेक पिकांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून शेतकऱ्यांनी जमीन मशागतापासून बी बियाणे खरेदी सेंद्रिय व रासायनिक खते खरेदी अशा अनेक प्रकारचा जो भांडवल त्या पिकासाठी लावला मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला तेवढा सुद्धा परत शेतीतील उत्पन्न द्वारे येणे शक्य राहिलेले नाही. म्हणून शिंदखेडा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा.
तसेच शिंदखेडा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे सरसगट कर्जमाफी करावी अन्यथा महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेतर्फे लोकशाहीच्या मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येतील. शेतकऱ्यांच्या व संघटनेच्या आंदोलनाद्वारे उद्रेक झाल्यास होणाऱ्या परिणामास शासन प्रशासन जबाबदार राहील याची विशेष नोंद घ्यावी. अशाप्रकारे महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनाचे तालुका अध्यक्ष व पदाधिकारी शेतकरी हे मोठ्या संख्येने उपस्थित राहून निवेदनाद्वारे शासनास कळविले.