शुद्ध श्रावण मासानिमित्त भव्य कावड यात्रा
सांगता
वरूळ : श्रावण मासानिमित्त समस्त ग्रामस्थ वरुळ घुसरे यांच्या सहकार्याने सुकवद पासून ते पुरातन महादेव मंदिर वरुल घुसरे पर्यंत दि.11/08/ 2025 रोजी सकाळी 6.00 वाजेपासून कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते, यात सर्व नागरिकांनी सहभाग घेतला होता.
हर्ष उल्हास करत ग्रामस्थांनी एकच नाद करत डि.जे च्या तालावर नृत्य करत आनंद साजरा केला,आणि ग्रामस्थांनी महादेवाला एकच मागणी केली की लवकरात लवकर आमच्या शिंदखेडा परिसरात वरून राज्याचे आगमन होऊन बळीराजा सुखावला पाहिजे.
वरूळ घूसरे येथी कावड यात्रेचा समारोप झाला.
पुरातन महादेव मंदिरात ग्रामस्थांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते.