spot_img
spot_img

नूतन विद्यालयात जादूचे प्रयोग आणि एपीआय गायकवाड यांचे मार्गदर्शन,,,,

नूतन विद्यालयात जादूचे प्रयोग आणि एपीआय गायकवाड यांचे मार्गदर्शन

धमाणे :- नूतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धमाने येथे आनंददायी शनिवार अंतर्गत विद्यार्थ्यांना जादूचे प्रयोग आणि शिंदखेडा पोलीस स्टेशनचे *ए पी आय श्री हनुमंत एल गायकवाड* साहेब यांचे मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माननीय आबासाहेब आर डी पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक श्री व्ही जी पाटील हे होते जादूचे प्रयोग दोंडाईचा येथील जादूगार रुबाब भाई यांनी सादर केले जादूचे प्रयोग सादर करत असताना त्यांनी कोणत्याही प्रकारची जादू नाही ही फक्त हात चलाखी आहे हे निक्षून सांगितले तसेच सामाजिक प्रबोधनही केले एपीआय श्री गायकवाड साहेब यांनी विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा आणि व्यायामाचे महत्त्व विशद केले तर कॉन्स्टेबल चेतन माळी यांनी अभ्यासाचे आणि गुरुजनांचे महत्त्व सांगितले त्याचबरोबर सामाजिक सलोखा राखण्याचा आवाहन केले कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते श्री विशाल माळी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस बी वाडीले यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!