साई ग्रुप सुरतचे श्री संदीप राजपूत इंटरनॅशनल ग्लोरी अवॉर्ड्स ने सन्मानित
शिरपूर : – सुरत येथील सुप्रसिद्ध उद्योगपती श्री रविशेठ राजपूत (देऊर शहादा) यांचे बंधू व साई ड्रेसेस, सुरतचे सीईओ श्री संदीप राजपूत यांना इंटरनॅशनल ग्लोरी अवॉर्ड्स 2025 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्री राजपूत यांना त्यांच्या अभूतपूर्व कार्याची दखल घेत “इंटरनॅशनल ग्लोरी अवॉर्ड्स 2025″ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला आहे. या विशेष प्रसंगी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया यांच्या हस्ते त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
हा गौरव केवळ एक पुरस्कार नसून, व्यवसाय, गुणवत्ता आणि सामाजिक बांधिलकीच्या मूल्यांचे प्रतीक आहे. संदीप राजपूत यांनी परिश्रम, नवनवीन कल्पना आणि ग्राहकांप्रती असलेली निष्ठा यांच्या आधारावर साई ड्रेसेसला केवळ सूरतमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात आणि परदेशातही एक ओळख निर्माण करून दिली आहे.
तंत्रज्ञानाचा योग्य वापर, दर्जेदार उत्पादन, कष्ट करणाऱ्या कर्मचार्यांबद्दलची आस्था आणि ग्राहकांचा विश्वास हे राजपूत यांच्या नेतृत्वाचे खरे गमक आहे. त्यांनी फॅशन क्षेत्रात निर्माण केलेला ठसा आज तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
या पुरस्कारामुळे केवळ संदीप राजपूत नव्हे, तर संपूर्ण साई ड्रेसेस टीमचे मनोबल उंचावले आहे. हा सन्मान त्यांच्या मेहनतीची, दूरदृष्टीची आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची पोचपावती आहे.”
सन्मान हे कधीही अचानक मिळत नाहीत, ते नेहमीच निरंतर मेहनत, विश्वास आणि चिकाटी यांची फळे असतात” हे संदीप राजपूत यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवले आहे.
महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्था शिरपूर तर्फे अध्यक्ष श्री संग्रामसिंग राजपूत व उपाध्यक्ष श्री योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी संदीप राजपूत यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.