आई वडिलांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करून दिला समाजाला पर्यावरणाचा संदेश
वृक्ष लागवडीसाठी वृक्ष संवर्धन समितीने केले सहकार्य
शिंदखेडा :- येथील रहिवासी लक्ष्मण लोटन चौधरी यांनी आई वडिलांच्या स्मरणार्थ आठ ते फुटाचे 10 वड व पिंपळाची लागवड करून आई वडिलांची स्मृती चिरंतन ठेवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.
साईनगर येथील रस्त्याच्या कडेला रोपांची लागवड करण्यात आली आहे. फक्त लागवड नाही तर लागवड केलेल्या रोपांचे संवर्धन केले जाणार आहे. प्रत्येकाने आपल्या नातेवाईकांच्या स्मृतीला उजाळा देऊन त्यांच्या आठवणी आयुष्यभर स्मरणार्थ रहावे या उदात्त भावनेतून वृक्षारोपण करावे. आपल्या मोकळ्या जागेत किंवा पडीक जमिनीवर झाडे लावून ते जगवावेत म्हणजेच पर्यावरणाचे क्षेत्र ही वाढेल आणि त्या झाडांशी आपले भावनिक नातेही वाढेल असे आवाहन लक्ष्मण चौधरी यांनी केले. वृक्ष लागवडीसाठी वृक्ष संवर्धन समितीचे सहकार्य लाभले
यावेळी वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष योगेश चौधरी, सदस्य राजेंद्र मराठे, भूषण पवार, देविदास चौधरी, जीवन देशमुख, दादा मराठे, अनिल मराठे यांच्यासह चिमुकले उपस्थित होते.
या प्रमाणे प्रत्येकाने आपल्या आई वडिलांच्या समरणार्थ वृक्षारोपण केल्यास पर्यावरणाचा समतोल राखून ऑक्सिजन ची मात्रा वाढेल , वृक्ष संवर्धन समिती दर वर्षी शेकडा रोपांची लागवड करून संवर्धन करते. समितीच्या वतीने मागेल त्याला वृक्ष मोहीम राबविण्यात येत आहे .
योगेश चौधरी – अध्यक्ष वृक्ष संवर्धन समिती, शिंदखेडा.