प्रत्येक शिक्षकांने विद्यार्थी व शाळेविषयी आत्मीयता ठेवावी प्रदीप दीक्षित
-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=
शिंदखेडा :- प्रत्येक शिक्षक व इतर सेवकांनी विद्यार्थी व शाळेविषयी आत्मीयता जोपासणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मीराबाई गर्ल्स विद्यालयातील संस्थाचालक व शिक्षक शिक्षिका सहविचार सभेत केले
प्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन स्वप्नील देसले उपस्थित होतें प्रसंगी जेष्ठ संचालक व सचिव आनंदा चौधरी खुशालभाई ओसवाल आधार महारू पाटील डॉ एन पि पाटील मोतीलाल पवार परेश देसले राजेश चौधरी प्रा प्रदीप दीक्षित मुख्याध्यापक जे पि पाटील उर्दूचे मुख्याध्यापक के बी अहिराराव यासंह संस्थेतील सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षिका शिक्षकेतर सेवक वर्ग उपस्थित होतें
प्रसंगी गर्ल्स हायस्कुलचे मुख्याध्यापक जे पि पाटील व के बी अहिराराव यांनी युनिटमधील विकासात्मक संदर्भ स्पष्ट केला
संस्थेच्या माध्यमातून संचालक प्रदीप दीक्षित यांनी मार्गदर्शनातुन शैक्षणिक वर्षात संस्थेने घेतलेले निर्णय यासंह या वर्षात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात्मक दृष्टिकोन मांडला प्रत्येक शिक्षक शिक्षकेतर सेवकांनी विद्यार्थी व शाळेविषयी आत्मीयता बाळगणे काळाची गरज असणार आहे विद्यार्थी सुसंस्कृत असावा गुन्हेगारीपासून अलिप्त असावा यासाठी सर्वांनी कंटाक्षाने लक्ष ठेवावे असे सांगितले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी बी जगताप यांनी केले तर मीराबाई कन्या विद्यालयासह उर्दू माध्यमिक विद्यालयाच्या सुरु असलेल्या विकासात्मक कामाचे संस्थेने कौतुक केले शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली