spot_img
spot_img

आर्थिक दुर्बल घटक योजनेतून २० विद्यार्थ्यांना आर्थिक मदत

आर्थिक दुर्बल घटक योजनेतून २० विद्यार्थ्यांना आर्थिक मदत

 

शिंदखेडा :- श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कै. शं. दे. पाटील उर्फ बाबुराव दादा साहित्य, वाणिज्य आणि कै. भाऊसाहेब म. दि. सिसोदे विज्ञान महाविद्यालय शिंदखेडा येथे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील आर्थिक दुर्बल घटक कुटुंबातील विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाकडून शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी मदतीचे धनादेश देण्यात आले. महाविद्यालयाच्या २० विद्यार्थ्यांना १,२२,००० रुपयांची आर्थिक मदत या माध्यमातून मंजूर करण्यात आली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने दरवर्षी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील होतकरू विद्यार्थ्यांन करिता शिक्षणात मदत करण्यासाठी सदरची योजना राबवली जाते. या योजनेत ज्या विद्यार्थ्यांचे पालक मयत आहेत, कोरोना काळात मृत्यू पावलेले आहेत, ज्यांची शेतकरी आत्महत्या झालेली आहे किंवा जे पालक दारिद्र्य रेषेखालील कार्ड धारक आहेत असे वेगवेगळे निकष लावून विद्यार्थ्यांची निवड विद्यापीठाकडून केली जाते
तथापि विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने महाविद्यालयातील एकूण २० विद्यार्थ्यांची शिफारस मान्य करत एक लाख २२ हजार रुपये मंजूर केलेत या रकमेचे धनादेश महाविद्यालयाचे स्थानिक कार्यकारणीचे अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब प्रफुलकुमार सिसोदे, उपाध्यक्ष आदरणीय बापूसाहेब अशोक पाटील आणि सदस्य आदरणीय भाऊसाहेब प्रा. सुरेश देसले यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे आदरणीय चेअरमन बाबासाहेब कुणाल पाटील यांनी विद्यार्थ्यांना विद्यापीठामार्फत स्कॉलरशिप मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. एन. एस. पवार, उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. व्ही. बोरसे, उपप्राचार्य प्रा. डॉ. व्ही. एस. पवार, उपप्राचार्य प्रा. एस. टी. राऊळ, प्रा. जितेंद्र पाटील, क्रीडा संचालक प्रा. आर. आर. पाटील आणि विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. यु. पी. खैरनार यांची सदर कार्यक्रमास उपस्थिती होती. तसेच महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी श्री पंकज साळुंखे व विशाल पाटील यांनी सहकार्य केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!