spot_img
spot_img

कर्तव्यदक्षतेचा उत्तम प्रत्यय; हरवलेल्या व्यक्तीचा अवघ्या १५ मिनिटांत शोध!

 


कर्तव्यदक्षतेचा उत्तम प्रत्यय; हरवलेल्या व्यक्तीचा अवघ्१५ मिनिटांत शोध!

पोलीस आणि प्रशासनाने दाखवला माणुसकीचा उत्कृष्ट नमुना

प्रतिनिधी – प्रविण चव्हाण

नंदुरबार, दि. 25 जून –

नंदुरबार – येथील रहिवासी संजय पाटील हे 22 जून रोजी कोणालाही न सांगता रागाच्या भरात घरातून निघून गेले होते. कुटुंबीयांनी नंदुरबार परिसरात सर्वत्र शोध घेतला, मात्र त्यांचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता.

या घटनेनंतर त्यांच्या नातेवाईकांनी परिवारासोबत पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले आणि अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांची भेट घेऊन संपूर्ण माहिती दिली.

आशिष कांबळे यांनी तातडीने संवेदनशीलतेने या घटनेची दखल घेत पोलीस निरीक्षक किरणकुमार कुमार खेडकर (उपनगर पोलीस स्टेशन) यांच्याशी संपर्क साधून तत्काळ शोध मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले.

पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी कर्तव्यदक्षतेचा उत्तम आदर्श घालत केवळ १५ मिनिटांत मोबाइल लोकेशनच्या साहाय्याने शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या तांत्रिक पथकाने तपास करताना मोबाइल लोकेशन सुरतजवळील चलथान परिसरात असल्याचे निदर्शनास आले.

सुरत येथील पोलीस मित्रांच्या मदतीने किरणकुमार खेडकर यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला व लगेचच व्हिडीओ कॉलद्वारे कुटुंबीयांशी संपर्क करून दिला. हा भावनिक क्षण अत्यंत हृदयस्पर्शी ठरला.

व्हिडीओ कॉलवर संजय पाटील यांच्याशी बोलतांना त्यांच्या परिवाराच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले आणि त्यांनी पोलिसांच्या या संवेदनशील व तत्पर मदतीबद्दल मन:पूर्वक आभार मानले.

कर्तव्यदक्ष अधिकारी आणि त्वरित कारवाई – एक आदर्श उदाहरण

या प्रकरणात अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे* आणि उपनगर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर तसेच हवालदार विकास पाटील यांचे काम अत्यंत कौतुकास्पद असून त्यांनी फक्त पोलिसी कामगिरीच नव्हे, तर एक सामाजिक जबाबदारी बजावली आहे.

अधिकारी असा असावा, जो फक्त नियम न पाहता माणुसकीही जपतो – याचे हे जिवंत उदाहरण आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!