spot_img
spot_img

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घेणाऱ्यांवर कारवाई करा; राज्यपालांचे आदेश

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घेणाऱ्यांवर कारवाई करा; राज्यपालांचे आदेश

पूजा खेडकर प्रकरणानंतर सतर्कता*

मुंबई :- देशाला आत्मनिर्भर बनवताना दिव्यांगांना स्वयंपूर्ण बनवणे आवश्यक असते. मात्र काही सक्षम व्यक्ती चुकीच्या पद्धतीने व चुकीच्या मार्गाने दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून सेवेत प्रवेश करणार नाहीत याबदल दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना जागरूक राहावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले, तसेच बनावट पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र घेणारे व देणारे अशा दोघांवरही कायदेशीर कारवाई केली पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या सार्थक एजुकेशन ट्रस्ट संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारतात एकूण लोकसंख्येच्या २.२९ टक्के दिव्यांग आहेत. आगामी जनगणना प्रथमच डिजिटल होईल यातून देशातील दिव्यांगांची देशातील निश्चित संख्या समजेल, असे राज्यपालांनी सांगितले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!