संपादकीय,,,,,,,,
शिंदखेडा :- शिंदखेडा शहरात व परीसरात विद्युत वितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना दिली जाणारी सेवा अत्यंत खालावलेल्या व निकृष्ट दर्जाची असून ग्राहक संरक्षण कायद्यानुसार आपण विज बिल व तसेच त्यावर अनेक अधिभार लावत विजेच्या बदल्यात मोबदला आपल्या ग्राहकांकडून वसूल करीत असतात ,विद्युत वितरण कंपनी अंतर्गत दिली जाणारी सेवा ही ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत येत असून आपल्याला आपल्या ग्राहकांना त्यांनी दिलेल्या मोबदल्यात योग्य ती सेवा देणे क्रमप्राप्त ठरते, गेल्या अनेक वर्षापासून शिंदखेडा व ग्रामीण भागात पावसाळा असो की उन्हाळा वारंवार विद्युत पुरवठा हा खंडित होत असतो त्यामुळे नागरिकांचे अत्यंत हाल होतात ,प्रत्यक्षात या संदर्भात अनेक संघटना अनेक पक्ष यांनी अनेकदा आंदोलने करून देखील विद्युत वितरण कंपनीच्या प्रशासनाला अद्यापही जाग आलेली नाही ,केवळ थातूरमातूर कामे पूर्ण करून वेळ काढूपणा करून घेण्याचा प्रकार विद्युत वितरण कंपनीच्या वरच्या स्तरावरील अधिकाऱ्यांकडून होत आहे.
यासंदर्भात आपण त्यावर योग्य ती अंमलबजावणी त्वरित करून अलाणे व परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत व अखंडित राहील, विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अंग चोरून काम न करता कायमस्वरूपी उपाय योजना करण्याकरता संपूर्ण परिसरातील विद्युत वितरणाचा सखोल अभ्यास करून त्रुटी असलेल्या बाबींची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करावे.
जेणेकरून वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा सुरळीत करता येईल.
या पुढें अश्या परिस्थितीत सुधारणा व उपाय योजना होत नसेल तर पुढील काळात शेतकरी बांधव व सामान्य नागरिकांकडून मोठे आंदोलनं उभे केले जाईल याची दक्षता अधिकारी वर्गाने घ्यावी.
एक सामान्य नागरिक व शेतकरी,,,