✍️✍️🚥🚥✍️✍️
संपादकीय,,,,
शिरपूर : – लोकमत तर्फे राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात ‘गावाची शान –
सरपंच महान’ या उपक्रमातर्गत गावात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सरपंचांना ‘आदर्श सरपंच पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते.शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील सरपंच राहुल रंधे यांना जिल्ह्यातील सर्वोकृष्ठ ‘सरपंच ऑफ द इयर अवॉर्ड’ तर बोरगांव येथील सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया व अर्थे येथील मनिषा मनोहर पाटील यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
लोकमत’तर्फे नुकताच जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या १३ वेगवेगळ्या क्षेत्रांतील सरपंचांना सन्मानित करण्यात आले. त्यात राहुल रंधे (‘सरपंच ऑफ द इयर अवॉर्ड’,बोराडी ता.शिरपूर), योगेंद्रसिंग सिसोदिया (आरोग्य,बोरगाव ता.शिरपूर),मनीषा मनोहर पाटील (पर्यावरण संवर्धन,अर्थ, ता. शिरपूर), रेखा राजेश पाटील (जलव्यवस्थापन,भिरडाणे,ता.धुळे), मनीषा राजेंद्र खैरनार (वीज व्यवस्थापन, वडगाव, ता.धुळे), भाऊसाहेब गुलाब देवरे (स्वच्छता, देऊर बुटूक, ता. धुळे), चेतन कैलास शिंदे (ग्रामरक्षण, धनूर-लोणकुटे, ता. धुळे), प्रियंका धीरज बडगुजर (शैक्षणिक सुविधा, सोनशेलू, ता. शिंदखेडा), नंदिनी विकास पाटील (उदयोन्मुख नेतृत्व, दभाषी, ता. शिंदखेडा), उज्ज्वला गोटू चौरे (पायाभूत सेवा, शेवगे ता.साक्री), जयश्री ज्ञानेश्वर हालोरे (प्रशासन/ई- प्रशासन/लोकसहभाग, बळसाणे, ता. साक्री), वंदना अनिल भोये (शासकीय योजना, शेलबारी, ता. साक्री), प्रकाश गोकूळ वळवी (कृषी तंत्रज्ञान, दहिवेल, ता. साक्री) या सरपंचाना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात लोकमतचे संस्थापक स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. या प्रसंगी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, स्थायी समिती वन्यजीव महामंडळाचे चैत्राम पवार, भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सयाजीराव भामरे, बीकेटी टायर्सचे मार्केटिंग हेड झुबेर शेख उपस्थित होते. तसेच परीक्षक जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. पंकज पाटील, कृषिभूषण प्रकाश पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
सरपंच अवॉर्डची घोषणा झाल्यापासून जिल्ह्यातील सर्व सरपंचांना उत्सुकता लागलेली होती,अखेर हिरे भवन धुळे येथे विविध क्षेत्रांत विशेष कार्य केलेल्या कर्तबगार सरपंचांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केल्याने संबंधित सरपंचांच्या कार्यावर मोहोर उमटली.
आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्याचे माजी शिक्षणमंत्री अमरीशभाई पटेल,आमदार काशिराम पावरा,जि प माजी अध्यक्ष डॉ तुषार रंधे, मा.नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, जि.प.उपाध्यक्ष देवेंद्र पाटील,भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान या कार्यक्रमात नारीशक्ती डान्स ग्रुप तर्फे शेतकरी गीतावर नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पूनम बेडसे यांनी मानले.